विवाहित बॉयफ्रेंडला आजही भेटते रश्मिका मंदान्ना; रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा

Uncategorized

नॅशनल क्रश रश्मिका नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती कायम आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. प्रोफेशनल लाईफ प्रमाणेच अभिनेत्री पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीचा गुडबाय हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं रश्मिकाने जोरदार प्रमोशन केलं होतं. या प्रमोशन दरम्यान रश्मिकाला अनेक रंजक प्रश्न विचारण्यात आले होते. एका मुलाखती दरम्यान रश्मिकाला विचारण्यात आलं की, ती त्याला हाय म्हणेल की बाय म्हणेल?

   

एवढंच नव्हेतर तिला पुढे विचारण्यात आलं की, ती जर तिच्या एक्स पार्टनरला भेटली तर तिची काय प्रतिक्रीया असेल? या प्रश्नावर उत्तर देत म्हणाली, मी अजूनही माझ्या एक्स पार्टनरसोबत बोलते. माझी त्याच्याशी आजही मैत्री आहे.

हे वाचा:   आईला फोन केला म्हणून... बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं

मला त्याच्या कुटूंबाला, मित्रांना, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य या सगळ्याला भेटायला आवडेल. हे चांगलं नाही हे देखील रश्मिकाने मान्य केलं आहे. पण माझे त्यांच्याशी चांगले संबध आहेत. आणि ही एक खूप चांगली गोष्ट आहे. 

याचबरोबर पुढे  तिला विजय देवरकोंडा याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला यावर रश्मिका म्हणाली की, तो खूप क्यूट आहे. आम्ही एकत्र कामही केलं आहे. आमचे विचारही जुळतात. त्यामुळे तो माझा खूप चांगला मित्र आहे. 

साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत. दोघंही प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा भाग ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सर्वांसमोर कबुली दिलेली नाही.

Leave a Reply