तुझ्यासारखे किती आले आणि गेले; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मनासी नाईकची नवी पोस्ट चर्चेत

Uncategorized

वाट बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेली मानसी नाईक तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मानसी पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. नृत्यातील दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मानसीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

   

‘ऐका दाजिबा’ या वैशाली सामंतच्या गाण्याने सगळ्यांनाच वेडं करुन सोडलं होतं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्याला २० वर्ष पूर्ण झाली आहेत.

याच निमित्ताने मानसीने तिच्या इन्स्टाग्राम वैशाली सामंत बरोबर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीएमध्ये वैशाली सामंत व मानसी ‘ऐका दाजिबा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. परंतु, या पोस्टच्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हे वाचा:   केवळ सिद्धार्थ-कियाराच नाही तर रकुल प्रीत सिंगही करणार आहे लग्न, जाणून घ्या ती कोणासोबत घेणार आहे फेरे ?

“तेच, किती आले आणि किती गेले”, असं कॅप्शन देत मानसीने हसण्याचे इमोजीही पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तिने ऐका दाजिबाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. “ऐका दाजिबाची २० वर्ष. संपूर्ण टीमचं मन:पूर्वक अभिनंदन. हे गाणं पाहतच मी मोठी झाले आहे.

शाळेतील वार्षिक समारंभ ते लग्नाच्या मंडपातील डान्स…या गाण्याबरोबर माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. या टीमबरोबर काम करण्याची संधी मिळेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. धन्यवाद. माझी नातवंडंही हेच गाणं ऐकून मोठी होतील, असं मला वाटतंय”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मानसी नाईकने जानेवारी २०२१मध्ये प्रदीप अरोराशी लग्नगाठ बांधली होती. बॉक्सर असलेल्या प्रदीपशी तिचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु, नंतर संसारात वादळ आल्याने आता त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply