बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोण ओळखत नाही. दोघंही खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असून त्यांना एक गोड मूलगी आहे.
त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर ते दोघं ‘गुरु’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले, त्यानंतरच एकमेकांशी बोलणं सुरू झालं आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमाचं नातं निर्माण होऊ लागलं. दोघांनी खूप दिवस एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने लग्न केलं.
नेहमी हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं पण यावेळी या दोघांची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे होत आहे. नुकतंच ऐश्वर्याने अभिषेकच्या एका वाईट सवयीबद्दल सांगितलं आहे जे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.
यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, त्याला एक वेगळीच समस्या आहे. तो त्याच्यासाठी कधीच जेवण ऑर्डर नाही करु शकत. जर सोबत त्याच्यासोबत मी नसेन तर तो खाण्याआधीच तिथून निघून जातो. तिने यामगचं कारणही सांगितलं आहे.
तिने पुढे सांगितलं की, तो एखाद्या कॉन्फरन्सला गेला असेल तर आतून कोणी बोलावायला आलं नाही तर तो आत जात नाही. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच कोणी ना कोणाची गरज असते.
पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ”मी नेहमीच त्याला विचारते की तू जेवण ऑर्डर केलं आहेस का? यानंतर तो म्हणतो मी नाही केलं ऑर्डर जेवण. त्याचं उत्तर ऐकून मी म्हणते की तू काय खाशील, मी ऑर्डर करते. या सेलिब्रिटी कपलचं हे संभाषण ऐकून चाहते हसू आवरत नाहीयेत.