‘फुकटमध्ये मला युज केलं आणि…’, Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा

Uncategorized

‘वाट बघतोय रिक्षावाला’ फेम मानसी नाईकनं आतापर्यंत तिच्या नृत्याच्या तालावर अनेकांना ताल धरायला मजबूर केलं. पण आज ती मानसी नाईक वैयक्तिक आयुष्यात वाट्याला आलेल्या फसवेगिरीनं पुरती हलून गेली आहे. मात्र सध्या ती या आयुष्यातील कठीण प्रसंगाला धीरानं सामोरी जातेय हे तिच्या पोस्ट वाचल्या की लक्षात येतं.

   

वर्षभरापूर्वी झालेलं मानसीचं लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कधी मानसीकडून तर कधी नवरा आणि बॉक्सिंगपट्टू प्रदीप खरेरा कडून होताना दिसत आहेत. केस कोर्टात सुरु असल्यानं दोघेही थेट बोलत नसले तरी शब्दांचा अचूक बाण एकमेकांना मारून जखमी करण्याचा प्रयत्न मात्र करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी मानसीचा पती प्रदीप खरेरानं आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडीओ रील पोस्ट केली,ज्यात एक गाणं बॅकग्राऊंडला वाजत आहे, अनं प्रदीपचे डोळे पाण्यानं भरलेले आहेत. इमरान हाश्मिच्या सिनेमातलं ‘जुदा होके भी ,तू मुझमे कही बाकी है’ हे गाणं त्या रीलमध्ये ऐकायला मिळालं.

हे वाचा:   पंतच्या मागे-मागे ‘उर्वशी’ पोहोचली ‘या’ शहरात, अखेरच्या क्षणी ऋषभकडून चकवा!

ती रील पोस्ट करत प्रदीप खरेरानं कॅप्शनमध्ये लोकांना विचारलं आहे की, ‘तुम्हाला कोणतं गाणं ऐकल्यावर रडू येतं?’ बस्स…एवढं प्रदीपनं पोस्ट केल्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी प्रदीपच्या या पोस्टला थेट मानसी नाईकशी जोडलं. पण मानसीच ती,गप्प कशी बसेल तिनं देखील तिखट प्रतिक्रिया देत नवऱ्याला सुनावलं आहे.

मानसी नाईकनं प्रदीप खरेराला स्पष्ट भाषेत सुनावत एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. तिनं त्यात लिहिलं,”आता तुझ्यासोबत दोन-दोन मुली आहेत..खरंतर रडण्याच्या ओव्हरअॅक्टिंगचे ५० रुपये कापायलाच हवेत. एकीकडे पार्ट्या करत मस्त आयुष्य जगतोय आणि इथे रीलमध्ये लोकांना रडून दाखवण्याची नाटकं..जा मीच फुकटमध्ये सहानुभूती देते तुला. जिच्या जीवावर खाल्लं,जिचा फुकट वापर करुन घेतला…कर्माचं फळ मिळेल…”, असं मानसीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हे वाचा:   लघुशंकेच्या ब्रेकसाठी कारमधून उतरला आणि बायकोलाच विसरला; १५० किमी प्रवास केल्यानंतर कळलं अन्…

आता मानसी नाईकची ही पोस्टही चर्चेत आली आहे. तिनं थेट प्रदीपच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी अप्रत्यक्षरिच्या टोला लगावला आहे.

Leave a Reply