सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत.
बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. फोटोत दिसणारी ही चिमुकली फक्त मराठी इंडस्ट्री नाहीत तर साऊथमधील देखील प्रसिद्ध चेहरा आहे.
श्रुती मराठेने (shruti marathe) तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.
तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच श्रुतीने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे. झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेची निर्मिती श्रुती आणि तिचा पती -अभिनेता गौरव घाटणेकर यांनी केली आहे.