‘माझा मुलगा सतत माझे इंटिमेट सीन…’; ट्विंकल खन्नाचा धक्कादायक खुलासा

Uncategorized

 बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) लग्नानंतर चित्रपटातून गायबच झाली. लग्नानंतर ती संसारात रमली. आज ट्विंकल ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त तिने दिलेली एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे.

   

मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. ट्विंकल खन्ना बिंधास्त विधानं करण्यासाठी लोकप्रिय आहे. तिने आजवर अनेक मुलाखतींमधून बेधडक विधानं करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. असाच एक किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला.

जेव्हा मुलगा आरवने तिचा किसिंग सीन सतत प्ले करुन बघितला

२०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकल म्हणाली, ‘मी माझ्या मुलांना माझे सिनेमे दाखवत नाही. माझा मुलगा आरव ‘जान’ (Jaan) सिनेमातील एक सीन सतत बघत होता. अजय देवगण (Ajay Devgan) सोबत माझा इंटिमेट सीन सुरु होता आणि आरव तोच सीन सतत प्ले करुन बघत होता. माझ्या वाढदिवशी तर त्याने या फोटोंचा एक कोलाजही बनवला. तेव्हा मला काय वाटले हे मी खरंच शब्दात व्यक्त करु शकणार नाही.

हे वाचा:   MMS घोटाळ्यानंतर अंजली अरोरा आता लग्न करून होणार सेटल , या करोडपतीसोबत घेणार सात फेरे

करिअरमध्ये काहीच मजा आली नाही 

९० च्या दशकात जरी मी अनेक चित्रपट केले असतील तरी मला काही फार मजा आली नाही. नोकरी आणि करिअर यात फरक असतो. मी करिअर एंजॉय केले नाही. मला फक्त घरी बसून पुस्तकं वाचायची होती. अनेकदा मी सेटवर शिवणकामही करायचे. हे बघून स्पॉटबॉय म्हणायचा ‘तुम्ही हे काम करु नका नाहीतर सगळे आंटीजी म्हणतील.’

ट्विंकलने ‘बरसात’ या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने ‘मेला’, ‘जान’, ‘इतिहास’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘जुल्मी’, ‘बादशाह’ या चित्रपटांत काम केले. आता ती एक यशस्वी लेखिका आणि निर्माती आहे. २००१ साली तिने अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली. दोघांना नितारा आणि आरव ही दोन मुले आहेत. सोशल मीडियावर ट्विंकल कायम सक्रिय असते.

Leave a Reply