बॉलीवूडचा किंग खान शाहरुखविषयीची एक मोठी बातमी आता समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख हा त्याच्या पठाण नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. दीपिका आणि त्याचे बेशरम रंग नावाचे गाणे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता किंग खान आजारी पडला आहे.
आपला आवडता अभिनेता आजारी असल्याचे कळताच नेटकऱ्यांना काळजी वाटू लागली आहे. सोशल मीडियावर किंग खानच्या पठाणची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. पठाणला आता धार्मिक, राजकीय रंग आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्रदर्शित होणारा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
आस्क मी एनिथिंगच्या एका सेशनमध्ये शाहरुखनं फीफा वर्ल्ड कप, आय़पीएल मॅच आणि पठाण यावरुन वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य केली होती. यावेळी त्यानं सध्या सोशल मीडियावर जे काही होते त्यावरुन आपली मतं ठरविण्याचा ट्रेंड हा वाढीस लागला आहे.त्यामुळे आपण अनेकांना ट्रोल करतो आहोत हे काही आपल्या लक्षात येत नाही. नकारात्मकता ही सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केली जाणारी गोष्ट आहे हे देखील आपण लक्षात घ्यायला हवे. असेही शाहरुखनं यावेळी सांगितले होते.
पठाणचा अजुन ट्रेलर प्रदर्शित होणे बाकी आहे. मात्र यापूर्वी त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरला आणि बेशरम रंग नावाच्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून चाहते आपल्या आवडच्या अभिनेत्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. पठाणची लाखो चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यात त्याच्याभोवती सुरु झालेल्या वादानं वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. तब्बल चार वर्षानंतर किंग खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
किंग खानची तब्येत बिघडली….
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या जवळच्या एका व्यक्तीनं त्याच्या आरोग्याविषयी एक महत्वाची माहिती दिली आहे. त्यानं शाहरुखच्या फुड हॅबिटविषयी माहिती दिली आहे. शाहरुखनं सांगितलं आहे की, गेल्या काही दिवसांपासुन फक्त डाळ भात खातोय, मला थोडा त्रास जाणवू लागल्यानं डॉक्टरांनी केवळ डाळ भात खाण्याचा सल्ला दिला आहे. शाहरुख आजारी असल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थनाही केली आहे. शाहरुखनं देखील त्याच्या ट्विटमध्ये आपण केवळ सिंपल डाएट फॉलो करत असल्याचे म्हटले आहे.