Video: बापरे! चक्क नागासमोर ‘माकड’चाळे, शेपटी ओढल्यानंतर नागाने काढला फणा अन्…; पाहा Viral व्हिडीओ

Uncategorized

Monkey vs Cobra Fight Video: सापासोबत मस्ती करणं म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखंच आहे. भारतातील विषारी सापांपैकी अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या नागापासून तर सर्वच चार हात लांब राहतात. माणसंही या सापासोबत माकडचाळे करत नाहीत. पण खुद्द माकडानेच एका भल्या मोठ्या नागासमोर ‘माकड’चाळे केले.

   

एका माळरानात नागासमोर माकड येऊन त्याची शेपटी धरून त्याला ओढू लागतो. पण नागानेही नेहमीप्रमाणे फणा काढून माकडाला चांगलीच अद्दल घडवली. नाग आणि माकडात झालेला खेळ कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माकडाने शेपटी ओढल्यानंतर नागाने घेतला बदला

एक माकड काळ्या कुट्ट नागासमोर मस्ती करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा माकड नुसते चाळेच करत नाही तर चक्क नागाला शेपटीला धरून ओढण्याचाही प्रयत्न करतो. त्यानंतर चिडलेल्या नागाने फणा काढून माकडाला डसण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. नागाच्या हल्ल्यापासून माकड कसाबसा वाचला.

हे वाचा:   ‘अक्षय कुमार’सोबत काम करण्यासाठी पूर्ण कपडे काढायला तयार झाली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आणि शेवटी खरंच काढले होते..

नागाने माकडाला फणा मारला, पण फण्याच्या स्पर्श माकडाला झाला नाही. त्यामुळे नागाच्या हल्ल्यात माकड वाचला. नागासमोर खेळ करणाऱ्या माकडाने काही वेळानंतर माघार घेऊन त्याठिकाणाहून धूम ठोकली असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

इथे पाहा व्हिडीओ

एरव्ही रानावनात भटकणारे माकड मानवस्तीत आल्यानंतर मात्र शांत बसत नाहीत. माणसांसोबतही ते मस्ती करण्यात पटाईत असतात. पण या माकडाने तर हद्दच केली. चक्क विषारी नागाचीच शेपटी ओढण्याचा कारनामा केला. गरुड आणि नागामध्ये लढाई झाल्याचे व्हिडीओ आपण नेहमी पाहतो. पण माकडानेही आता नागासारख्या सापासोबत चाळे करण्याचा विचार केल्याचं या व्हिडीओतून समोर आलं आहे.

नागाला स्पर्श करताना सर्पमित्रही आवश्यक ती खबरदारी घेतात. पण या माकडाला नागाची जराही भीती वाटली नाही आणि तो थेट त्याची शेपटीच ओढण्याचा प्रयत्न करतो. पण नागानेही माकडाला फणा मारून जशास तसं उत्तर दिल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

Leave a Reply