अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये बिनसलं? Viral Video नंतर चर्चांना उधाण

Uncategorized

बॉलिवूडमध्ये सर्वात आवडत्या जोडीपैकी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आहेत. कपल गोल्स देण्याच्या बाबतीत ही जोडी कधीही मागे पडली नाही. मात्र अलीकडेच त्यांना बघून त्यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याची अफवा उडाली आहे.

   

सुभाष घई यांच्या पार्टीमध्ये अभिषेक-ऐश्वर्या सहभागी झाले होते. त्यावेळी ऐश्वर्या काहीशी नाराज दिसत होती आणि ही बाब नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. ती अभिषेककडे रागाने एक टक लावून बघत होती. सोशल मीडियावर या दोघांचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत.

ETimes ने सुभाष घई यांच्या पार्टीतील अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून ज्यात अभिनेत्री अभिषेकवर रागावलेली दिसत आहे. ETimes ने ऑक्टोबर २०२२ मध्ये मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमधीलही या दोघांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावेळीही ऐश्वर्याची प्रतिक्रिया अशीच काहीशी होती.

हे वाचा:   बॉलीवूड स्टार्स प्रायव्हेट जेट: हे स्टार्स आहेत प्रायव्हेट जेटचे मालक, गुपचूप करतात परदेशवारी

दरम्यान ऐश्वर्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले कारण ती एकदम रागात अभिषेककडे पाहत आहे. ETimes ने या प्रतिक्रियांविषयीचा व्हिडिओ शेअर केला असून नेटकरी त्यांच्या लग्नाला ‘Unhappy Relationship’ असेही म्हणत ट्रोल करतायंत.

पहिल्यांदा माफी ऐश्वर्याच मागते

ऐश्वर्या काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये तिच्या ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. तेव्हा तिला कपिलने विचारले की, तिचे आणि अभिषेकचे क्षुल्लक भांडण झाले आहे का? ज्यावर तिने हो असे उत्तर दिले होते.

यानंतर कपिलने पुढील प्रश्न असा विचारला की, मग त्यावर पहिली माफी कोण मागतं? हे ऐकून ऐश्वर्या हसायला लागते आणि नवज्योतसिंग सिद्धू मध्येच थांबवून म्हणतात की, ‘हा काय प्रश्न झाला? अभिषेकच आधी सॉरी म्हणत असेल.’ यानंतर ऐश्वर्या असं उत्तर देते की, ‘नाही. मी आधी माफी मागते आणि भांडण संपवायला बघते’.

हे वाचा:   पाणी पुरी की पिठलं भाकरी? देशमुखांच्या सुनेला आवडतात या गोष्टी

Leave a Reply