तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन; वयाच्या 40 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Uncategorized

 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते सुनील होळकर (Sunil Holkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

   

सुनील होळकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सुनील यांनी अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये (Serial) आणि सिनेमांत (Movies) काम केलं आहे.

‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमात सुनील यांनी शेवटचं काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सोरायसिस या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. आज उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

हे वाचा:   ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबाती लवकरच होणार बाबा?, व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सुनील होळकर यांचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. अभिनेता असण्यासोबत ते एक उत्तम निवेदकदेखील होते. त्यांनी ‘तारक मेहता..’,’मॅडम सर’, मि.योगी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

मालिका आणि सिनेमांसह सुनील होळकर (Sunil Holkar) यांनी रंगभूमीदेखील गाजवली आहे. 12 वर्षांपेक्षा अधिक वर्षे त्यांनी रंगभूमीवर काम केलं आहे. नाटक (Drama), मालिका (Serial) आणि सिनेमांसह (Movies) त्यांनी ‘भूताटलेल्या’ या वेबसीरिजमध्येदेखील (Web series) काम केलं आहे.

तसेच ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या सिनेमासह त्यांनी ‘मोरया’ (Morya) या गाजलेल्या सिनेमातदेखील काम केलं आहे.

Leave a Reply