बाॅलिवूडमध्ये करिश्मा कपूर हिने एक काळ प्रचंड गाजवला आहे. अनेक हीट चित्रपटांमध्ये करिश्मा कपूर हिने काम केले असून आजही करिश्मा कपूर हिने केलेल्या अभिनयाचे चाहते काैतुक करतात. गेल्या काही वर्षांपासून करिश्मा कपूर ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर करिश्माचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेकदा करिश्मा कपूर ही करिना कपूरसोबत स्पाॅट होते.
काही दिवसांपूर्वीच या बहिणी मुंबईमध्ये स्पाॅट झाल्या होत्या. करिश्मा कपूर कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. संजय कपूर याच्यासोबत करिश्मा कपूर हिने २०१६ मध्ये घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी लग्नाच्या तब्बल १३ वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
संजय कपूर याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले. करिश्माने म्हटले होते की, लग्नाच्यानंतर आम्ही फिरायला गेलो, तेंव्हा मित्रांबरोबर माझी बोली संजय कपूर याने लावली होती. मी जेंव्हा याला नकार देण्यास सुरूवात केली, तेंव्हा मला मारहाण करण्यात आली.
इतकेच नाहीतर एकदा संजय कपूर याने त्याच्या आईला मला कानाखाली मारण्यास सांगितली होती. विशेष म्हणजे तेंव्हा मी प्रेग्नेंट असल्याचे देखील करिश्मा कपूर हिने म्हटले होते. संजय कपूर याच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर अभिषेक बच्चन याच्यासोबत करिश्मा कपूर हिचा साखरपुडा झाला होता.
इतकेच नाहीतर अभिषेक बच्चन आणि करिश्माचा साखरपुडा होऊन रिलेशन तुटले होते. यानंतर मग करिश्मा कपूर हिने व्यवसायिक संजय कपूर याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
करिश्मा कपूर हिच्यासोबत घटस्फोट घेणे संजय कपूर याला खूप जास्त महाग पडले आहे. आजही करिश्मा कपूर हिला दर महिन्याला भत्ता म्हणून संजय कपूर याला १० लाख रूपये द्यावे लागतात. इतकेच नाहीतर दिल्लीमधील संजय कपूर याच्या वडिलांचा बंगला देखील करिश्मा कपूरच्या नावावर करण्यात आलाय.
संजय कपूर याने करिश्मा कपूर हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसरे लग्न केले आहे. मात्र, अजूनही करिश्मा कपूर हिने लग्न केले नाहीये. करिश्मा कपूर हिच्या अगोदरही संजय कपूर याचे लग्न झाले होते. करिश्मा कपूरसोबतचे संजयचे दुसरे लग्न होते.