‘तिला सांगा’; उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतच त्यांचं ‘आज मैंने मूड बना लिया है’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद प्रकरणावर भाष्य केलं आहे.

   

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस म्हणाल्या,”उर्फी जावेद प्रकरणावर मला नक्कीच बोलायला आवडेल. पण त्यासंदर्भात बोलण्याची ही वेळ नाही. आज माझी फक्त ‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्यासंदर्भात बोलण्याची इच्छा आहे. या गाण्यावर मला सर्वांना थिरकायला लावायचं आहे. तुम्हीदेखील या गाण्यावर डान्स करा… आणि उर्फीलादेखील डान्स करायला सांगा”. 

आता अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर उर्फी जावेद थिरकणार का? ‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्यावर उर्फी थिकरल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा:   स्मृती इराणींची लेक अडकली विवाहबंधनात, पहिला फोटो समोर

अमृता फडणवीस यांची अनेक गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणीस यांचे ‘जय लक्ष्मी माता’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.

आता अमृता फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे रिलीज केले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.

उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता चित्रविचित्र कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु, हा नंगानाच असाच सुरू राहणार असल्याचं उर्फी म्हणाली आहे.

Leave a Reply