‘तुझ्या मुलानं मजा करायच्या वयात तूच…’ अर्जुनला किस करतानाच्या फोटोमुळे मलायका ट्रोल

Uncategorized

बी-टाऊनमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेली मलायका अरोरा सतत चर्चेत असते. मलायका वयाच्या 49 व्या वर्षीही खूपच बोल्ड आणि एनर्जेटिक असते. आजही मलायका फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना लाजवते. अभिनेत्री कायम चर्चेत असली तरी तिला अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

   

अशातच नव्या वर्षीही मलायकाला ट्रोल केलं जात असल्याचं पहायला मिळत आहे. अभिनेत्रीने नव्या वर्षी अभिनेता अर्जुन कपूरसोबत फोटो शेअर करताच ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

सगळीकडे नववर्षाचा आनंद पहायला मिळत असताना बॉलिवूडकरही नववर्षाचा आनंद लुटताना दिसून आले. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नवीन वर्ष साजरं केलं आणि सोशल मीडियावर फोटोही पोस्ट केले. मलायका अरोरानेही तिच्या जवळच्या व्यक्तीसोबत फोटो शेअर केला.

हे वाचा:   कपाळावर टिळा लावल्यानंतर त्यावर तांदूळ का लावले जाते..जाणून घ्या यामागील कारण..

हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आहे. मलायकाने अर्जुनसोबत किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. मलायकाने हा पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी दिला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली.

मलायकाने अर्जुन कपूरसोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच, ज्या वयात मुलांनी मजा करायची त्या वयात आईच मजा करत आहे, नव्या वर्षाची सुरुवात लोक आपल्या कुटुंबासोबत करतात आणि ही आपल्या धुनमध्ये मस्त आहे, तुमच्यामुळे तरुणांना काय संदेश जातोय, आई मुलगा चांगले दिसतायेत, अशा अनेक कमेंट करत मलायकाला ट्रोल करत आहेत.

दरम्यान, मलायका तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही कायम एकत्र स्पॉट होतात. बी-टाऊनमधील लोकप्रिय कपलपैकी मलायका आणि अर्जुन आहेत. दोघे कधी लग्न करणार? असा प्रश्न चाहते कायमच विचारतात.

हे वाचा:   या प्रसिद्ध नेत्याला बनवायचं होत करीना कपूरला आपली बायको; त्या नेत्याचं नाव ऐकून तुम्हीही गोंधळून जाल.!

मलायका आणि अर्जुन दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका सध्या तिचा शो ‘मूविंग विथ मलायका’मुळे चर्चेत असते. या शोमधून तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

Leave a Reply