मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणून तेजस्विनी पंडीत ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिची अथांग ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीने केलेलं वक्तव्य खूप चर्चेत आहे
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, जुन्या आठवणी आपण नेहमीच ऐकतो. वाचतो. मात्र त्यांच्या आयुष्यात असेही काही किस्से असतात, जे अजूनही त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचलेले नसतात.
कलाकारांच्या अशाच अनेक गोष्टी, किस्से, रहस्यं प्लॅनेट मराठी चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. नुकताच एक नवा शो आपल्या भेटीला आला आहे ‘पटलं तर घ्या’ असं या शोचं नाव आहे. यात सेलिब्रेटींसोबत दिलखुलास गप्पा, काही न ऐकलेले किस्से, मजेशीर खेळ यांसारख्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळताना दिसत आहे.
या शोचा हा पहिला सिझन असून या सिझनमध्ये एकूण ८ एपिसोड्स आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये अभिजीत पानसे आणि तेजस्विनी पंडित आपल्या भेटीला आले आहेत. या धमाल एपिसोडमध्ये तेजस्विनी तिच्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफबद्दल बरेच खुलाशे केले आहेत. बेस्ट आणि वाईट रुमर्ड तू तुझ्याबद्दलचं ऐकलेलं असा प्रश्न तिला या सेगमेंटबद्दल विचारण्यात आलं आहे.
यावंर उत्तर देत तेजस्विनी म्हणाली की, ”माझं आणि संजय जाधवचं अफेअर आहे हे सगळ्यात वाईट रुमर्ड होतं माझ्यासाठीचं. कारण तो माझा दादा आहे. आणि हे सगळ्यात वाईट रुमर्ड आहे माझ्याबद्दलचं. कारण आम्ही दोघं ईतके घट्ट आहोत कारण मला तो व्दितीसारखं (संजय जाधव यांची मुलगी) ट्रिट करतो. आणि मग रुमर्ड करण हे खूप चूकिचं आहे.” तिने तिचं हे उत्तर देत संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्रीच्या या वक्तव्यांनंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच हैराण झाले.