Ashok Saraf: सिनेमात अशोक सराफ शर्टचे पहिले दोन बटण उघडे का ठेवत? कारण आहे फारच रंजक

Uncategorized

बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी यामध्ये फॅशन, स्टाईल, ट्रेंड या गोष्टी अगदी सामान्य आहेत. आत्ताच नव्हे तर अगदी पूर्वीपासून कलाकारांनी चित्रपटांमध्ये एखादी नवी स्टाईल ट्राय केली की तो ट्रेंडच सेट होतो. कलाकारांच्या केसांपासून ते कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींकडे चाहते फॅशन म्हणून पाहात असतात.

   

आणि हेच ट्रेंड ते फॉलोसुद्धा करत असतात. त्यामुळे सिनेसृष्टीत आजपर्यंत अनेक कलाकार ट्रेंड सेटर ठरले आहेत. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचासुद्धा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. अशोक मामांनीसुद्धा एक नवा पायंडा पाडला होता. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशाह म्हणून अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. अशोक सराफ यांना सिनेइंडस्ट्रीमधील लोक मामा या नावाने ओळखतात. मामांनी ‘अशीही बनवाबनवी’ मध्ये साकारलेले धनंजय माने असो किंवा धुमधडाकामध्ये साकारलेले उद्योगपती यदुनाथ जवळकर असो आजही लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगची गोष्टच वेगळी आहे.

हे वाचा:   उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात? आधी केले गंभीर आरोप अन् आता म्हणाली “आय लव्ह यू”

मामांनी मराठी असो किंवा हिंदी या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमठविला आहे. आजही त्यांचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. अशोक सराफ फक्त अभिनयासाठीच नव्हे तर एका स्टाईल स्टेटमेंटसाठीदेखील ओळखले जात होते.

अशोक सराफ यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी असत. तुम्ही जर त्यांचे चाहते असाल तर एव्हाना ही गोष्ट तुमच्या नजरेतून चुकलेली नसेल. अशोक सराफ यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला होता.

शर्टची दोन बटने उघडी असण्यामागचं कारण एकतर फॅशन हे आहेच पण त्याचं खरं कारण म्हणजे अशोक सराफ यांना शर्टची पूर्ण बटने लावल्याने अस्वस्थ वाटत असे. त्यांना यामध्ये गुदमरल्यासारखं व्हायचं. आणि शर्टची दोन बटने उघडी ठेवल्याने त्यांना फारच मोकळं आणि छान वाटायचं. अशात त्यांना अतिशय मोकळेपणाने कामही करता यायचं. आणि म्हणूनच मामा आपल्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी ठेवत.

हे वाचा:   तुम्हीही आवडीने चहासोबत खाता टोस्ट? मग एकदा हा VIDEO पाहाच, खाण्याआधी कराल विचार

परंतु कालांतराने त्यांच्या चाहत्यांना ती फॅशन वाटू लागली आणि अशाप्रकारे मामांनी हा नवा ट्रेंड सेट केला.मराठी चित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखले जाणारे हे हरहुन्नरी अभिनेता सर्वांनाच आपलेसे वाटतात. त्यांचा निरागस आणि निखळ विनोद आज सर्वांनाच हसवून लोटपोट करतो. मामांनी मराठी इंडस्ट्रीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत.

मराठी सिनेसृष्टीला फुलविण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अशोक सराफ यांनी केवळ मराठी-हिंदी चित्रपटच नव्हे तर अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आजपर्यंत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे.

Leave a Reply