मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) या ना त्या कारणांमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात Active असते. तसेच सारा तेंडुलकचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती ग्लॅमरच्या दुनियेत आपली ओळख बनवत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का अशी चर्चा होती. मात्र त्या चर्चांमध्ये काहीच तथ्थ नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच आता शुभमन गिल म्हणता म्हणता सारा तेंडुलकरचे दुसऱ्याच व्यक्तीसोबतचे फोटो व्हायरल (photo viral) होताना दिसत आहे.
सारा तेंडुलकर ही सिद्धार्थ केतकर (siddharth kerkar) नावाच्या अभिनेत्यासोबत बुलेट राईडवर गेली होती. सध्या दोघांचा एक फोटो व्हायरल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये त्या दोघांनी ही हेल्मेट घातलेल दिसत आहे. विशेष बाब म्हणजे सिद्धार्थ केरकर सेल्फी घेत असून त्याने सारा तेंडुलकरच्या कमरेवर हात ठेवून पोज दिली आहे. हा व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडला, नक्की मित्र आहे का प्रेम? आतापर्यंत साराचे शुभमन गिल सोबत चर्चा होती. मात्र या अभिनेतासोबत फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधान आलं आहे.
फोटो व्हायरल
सारा तेंडुलकरच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. सारा तेंडुलकरचा हा फोटो एका फॅन पेजने शेअर केला आहे. यावर हजारो लाईक्स मिळाले असून कमेंट बॉक्स खाजगी ठेवण्यात आला आहे. या फोटोवर कॅप्शन देखील दिलेली नाही. यामुळे या दोघांमध्ये नक्की मैत्री आहे का प्रेम अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सिद्धार्थ केरकरने शेअर केला फोटो
सिद्धार्थ केरकर (siddharth kerkar) सध्या गोव्यात राहत असून त्यांने स्वत:च्या इंस्टाग्राम पेजवर स्वतःला अभिनेता म्हणून वर्णन केले आहे. तो एक कलाकार असून त्याला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. याशिवाय सिद्धार्थ केरकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून त्याने अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तो जिममध्ये पोज देताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये सारा तेंडुलकरचे पालक सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकरसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.
वाढदिवसानिमित्त शेअर केला फोटो
13 आठवड्यांपूर्वी सिद्धार्थ केरकरने सारा तेंडुलकरसोबतचा हा फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यासोबत त्यांनी सारा तेंडुलकरला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोवर प्रतिक्रिया देताना सारा तेंडुलकरने लिहिले, ‘धन्यवाद बेस्टी…