अनिल कपूरच्या एका कृत्यामुळे जोरजोरात ओरडली होती माधुरी, कॅन्सल केलं होतं गाण्याचं शूटींग

Uncategorized

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सुंदरतेसाठीही नेहमीच चर्चेत असते. आपल्या प्रत्येक भूमिकेतून तिने फॅन्सना वेड लावलं आहे. कोणत्याही स्टारसोबत तिची जोडी हिट होत होती. पण अनिल कपूर आणि तिची जोडी सगळ्यात जास्त पसंत केली गेली. आज या जोडीबाबतचा एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. माधुरी अनिल कपूरच्या एका कृत्यावरून जोरजोरात ओरडू लागली होती.

   

अनिल आणि माधुरी ‘टोटल धमाल’ चं प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते. यादरम्यान अनिल कपूर आणि माधुरीने त्यांच्या करिअरसंबंधी काही किस्से सांगितले होते. अनिल यांनी सांगितलं होतं की, आजही ते एक गाणं बघतात तेव्हा त्यांना माधुरीची आठवण नक्की येते. ते गाणं म्हणजे पुकार सिनेमातील ‘किस्मत से तुम हमको मिले हो’ हे गाणं.

हे वाचा:   Ram Kapoor : राम कपूरने 'या' ट्रिकने कमी केले वजन, रात्री झोपण्यापूर्वी हे काम करायचा

शोमध्ये बोलताना अनिल कपूर यांनी सांगितलं होतं की, जेव्हा पुकार सिनेमातील या गाण्याचं शूटींग सुरू होतं तेव्हा या गाण्याचं शूट फार थंडीत केलं होतं. त्यावेळी तापमान मायनस होतं. कडाक्याच्या थंडीत शूटींगवेळी अनिल कपूर हे जॅकेट, कोट आणि मफलर घेऊन होते. पण माधुरी एका पातळ शिफॉन साडीमध्ये होती. त्यावेळी थंडीमुळे माधुरीची हालत खराब झाली होती. थंडीमुळे तिचा चेहरा निळा पडू लागला होता.

यावेळी माधुरीने सांगितलं की, ‘गाण्याच्या शूटींगवेळी फारच थंडी होती. अचानक शूटींगवेळी हवा बंद झाली होती. मला वाटलं चला थोडा आराम मिळेल. त्यावेळी अचानक अनिल कपूर म्हणाले की, हवा बंद झाल्यामुळे काही मजा येत नाहीये. चॉपरला खाली आणा, साडी उडाली नाही तर मजा येणार नाही’. मग माधुरी म्हणाली की, ती रागात तेव्हा रडू लागली होती. जोरजोरार ओरडू लागली होती. मी हे काहीच करणार नाही असंही ती म्हणाली होती.

हे वाचा:   “आम्ही एकत्र रुमवर…” दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडने त्यांच्या नात्याबद्दल केला खुलासा

दरम्यान, अनिल कपूर आणि माधुरीने सोबत सगळ्यात जास्त सिनेमे केले. ‘टोटल धमाल’, ‘जमाई राजा, ‘राम लखन’, ‘किशन कन्हैया, ‘तेजाब’ सारखे 18 सिनेमे त्यांनी सोबत केले. 

Leave a Reply