आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली अनोखी शक्कल; ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Uncategorized

लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अभिनयाची ताकद प्रचंड आहे. नुसत्या आवाजाच्या बळावर त्यांनी सिनेसृष्टीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज कलाकारांमध्ये त्यांचं नाव अदबीने घेतलं जातं. प्रेक्षकही त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. ते उत्कृष्ट वक्ते आहेत.

   

त्यांचं त्यांच्या आईवरही तितकंच प्रेम आहे. एखाद्याने आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र आई ५०० वर्ष जगावी म्हणून प्रयत्न करणारा व्यक्ती तुम्ही पाहिलाय का?

सयाजी यांनी आपल्या आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे आणि त्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जगणारही आहे. सयाजी यांनी असं काय केलंय ज्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जिवंत राहणार आहे, हे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.

हे वाचा:   'लग्न करु की नको?'; चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ताचं भन्नाट उत्तर, म्हणली...

सयाजी यांनी आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या वजनाइतक्या बिया लावण्याचा निर्धार केला आहे. एका कार्यक्रमात आईबद्दल बोलताना सयाजी म्हणाले, ‘माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. प्रत्येकाला वाटतं त्याची आई खूप जगावी. माझी आई मला आयुष्यात कायम जिवंत राहायला हवीये जीपर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत. मग ती कशी राहील?

मी आईला म्हटलं बघ तू काय ५०० वर्ष जगणार नाहीस. मला तू कायम जिवंत राहायला हवीस. मी एक काम करतो तुझ्या वजनाइतक्या देशी झाडांच्या बियांची तुला करतो. एका बाजूला तुला ठेवतो . एका बाजूला बिया ठेवतो आणि तुझ्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रात लावतो. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील. त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील, सावलीत असशील आणि कायम राहशील.’

हे वाचा:   “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण

पुढे त्यांनी म्हटलं, ‘झाडं लावायचं मी काही सामाजिक काम करत नाही. मला आवड आहे ती आणि आईला मी वचन दिलंय तुझ्या वजनाएवढ्या बिया लावेन म्हणून मी ते काम करतो. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं ऋण फेडायचं असेल तर माता आणि धरतीमाता यांच्याइतकी मोठी गोष्ट जगात नाही. तेवढं आपण सांभाळलं तर बस आहे.

आपण खूप मोठे झालो. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सयाजी यांनी ‘सहयाद्री देवराई’च्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील अनेक माळरानांवर झाडं फुलवली आहेत आणि ती जगवलीही आहेत.

Leave a Reply