आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या ‘इतकी’ संपत्ती; आता कोण आहे वारसदार?

Uncategorized

सहा दशकांहून अधिक काळ भारतीयांवर आपल्या मधुर आवाजाची मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांची आज पुण्यतिथी. 6 फेब्रुवारी 2022 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज आणि स्वर मात्र अजरामर आहे. या ‘सूरांची सरस्वती’ ची एकूण संपत्ती किती होती आज जाणून घेऊया…

   

गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ भारतीयांवर आपल्या मधुर आवाजाची मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांची आज पुण्यतिथी.

लतादीदी गाण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती तुम्हाला नसेल.

लतादीदींची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती 368 कोटी रुपये आहे.लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी मानधन मिळालं होतं ते होतं फक्त 25 रुपये.

हे वाचा:   अभिनेता आमिर खान सोडणार देश? किरण रावचं मोठं वक्तव्य

आज त्यांची संपत्ती काही कोटींच्या घरात आहे. Trustednetworth.com च्या अहवालानुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे 5 कोटी डॉलर्स इतकी आहे म्हणजेच अंदाजे 368 कोटी रुपये आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांची ही संपत्ती निर्माण झाली आहे.

लता मंगेशकर यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर प्रभु कुंज भवन नावाचे घर आहे. या घराची किंमत करोडोंमध्ये आहे.लता मंगेशकर या कारच्या शौकीन होत्या. त्यांच्याकडे शेवरलेट, ब्यूक आणि क्रायस्लर अशा अनेक शानदार कार्स होत्या.

याशिवाय ‘वीर झारा’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी एक मर्सिडीज कार भेट दिली होती.

लतादीदींच्या निधनानंतर संपूर्ण मालमत्ता लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर बनवलेल्या ट्रस्टकडे जाईल, असे म्हटले जात आहे.लतादीदींच्या निधनानंतर संपूर्ण मालमत्ता लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर बनवलेल्या ट्रस्टकडे जाईल, असे म्हटले जात आहे.

हे वाचा:   Kareena Kapoor : करीना कपूरचं प्रायव्हेट पार्टच्या साईजबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, माझ्यासाठी

तसेच त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींचे अंत्यसंस्कार केल्यामुळे त्यांना दिवंगत गायकांच्या संपत्तीचा वारसा मिळेल, असे म्हटले जाते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Leave a Reply