तीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न, रात्रीसाठी बनवलं खास वेळापत्रक

Uncategorized

भारतात एकापेक्षा अधिक विवाहांना मान्यता नाही. पण जगातील असे काही देश आहेत, जिथे असा कायदा लागू होत नाही. पुरुषांना किंवा महिलांना एकापेक्षा अधिक विवाह (Marriage) करण्याची मुभा असते. आपण अशा अनेक घटना वाचत किंवा ऐकत असतो. ज्यात एका पुरुषाच्या तीन पत्नी किंवा चार पत्नी, इतकी मुलं. पण सध्या एक अजब गजब प्रकरण समोर आलं आहे. ज्याची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे.

   

तीन बहिणींचं एकाच मुलाशी लग्न


केनियामध्ये (Kenia) नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. इथं तीन सख्ख्या बहिणींचं (Sisters) एकाच व्यक्तीवर प्रेम जडलं. विशेष म्हणजे या तिघींनी त्या तरुणाशी लग्नही केलं. परस्पर संमतीने या तिघींनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्या मुलानेही तीन बहिणींशी लग्न करण्यास होकार दिला. लग्नानंतर चारही जण गुण्या-गोविंदाने नांदतायत.

पहिल्याच नजरेत प्रेम


केनियामध्ये राहणाऱ्या केट, इव आणि मेरी या तीन सख्ख्या बहिणी आहेत. तिघीही संगीत शिकतात. शिक्षणादरम्यान केटची ओळख स्टिओ नावाच्या तरुणाशी झाली. पहिल्याच नजरेत दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. काही काळाने केटने स्टिओची ओळख आपल्या इतर दोन बहिणींशी करुन दिली. मजेची गोष्ट म्हणजे इव आणि मेरी या दोघींनाही स्टिओ प्रचंड आवडला. पण ही गोष्ट स्टिओला माहित नव्हती.

तीन बहिंणीसमोर प्रेमाचा प्रस्ताव


केट आणि स्टिओचं प्रेमप्रकरण सुरु असतानाच इव आणि मेरीनेही स्टिओकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर स्टिओ त्या तिनही बहिणींना डेट करु लागला. काही महिन्यांनंतर स्टिओने तिनही बहिणींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तसा प्रस्ताव त्याने तिघींसमोर ठेवला. स्टिओचा हा प्रस्ताव तिनही बहिणींनी स्विकार केला. त्यानंतर परस्पर संमतीने तिनही बहिणींनी स्टिओशी लग्न केलं.

स्टिओसाठी बनवलं वेळापत्रक


स्टिओसोबत राहण्यासाठी तीन ही बहिणींनी खास वेळापत्रक बनवलं आहे. आठवड्यातून कोणत्या दिवशी कोण स्टिओबरोबर राहणार याचं नियोजन करण्यात आलं आहे. स्टिओच्या म्हणण्यानुसारक तीघींबरोबर राहण्यात त्याला कोणतीच समस्या येत नाही. वेळापत्रकानुसार सोमवार आणि गुरुवारी तो मेरीबरोबर राहतो. मंगळवार आणि शुक्रवार त्याने केटला दिला आहे. तर बुधवार आणि शनिवारी तो इवबरोबर वेळ घालवतो. रविवारी चारही जण एकत्र येतात आणि भरपूर एन्जॉय करतात. 

काहीही असो पण या अनोख्या लग्नची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे हे नक्की.

हे वाचा:   टॉलीवूडमध्ये मोठी खळबळ; तब्बल 22 वर्षानंतर होणार थलपथी विजयचा घटस्फोट?

Leave a Reply