माझं एका नेत्याशी लग्न झालंय, त्याने दिलेल्या घरात मी राहते; अफवेबद्दल सोनाली स्पष्टच बोलली

Uncategorized

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनालीने अनेक उत्कृष्ट भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून दाद दिली. सुरुवातीला आपल्या आवाजामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नाकारण्यात आलेली सोनाली आज यशाच्या शिखरावर आहे.

   

तिने मराठी सिनेमात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. मात्र अशीही एक वेळ होती जेव्हा तिच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या आणि त्या अफवांमुळे सोनालीला प्रचंड मनस्ताप झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनालीने तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट अफवेबद्दल सांगितलं आहे. आपलं एका नेत्यासोबत लग्न झालंय ही अफवा तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर आणि जाणून बुजून पसरवली गेली होती.

हे वाचा:   केवळ सिद्धार्थ-कियाराच नाही तर रकुल प्रीत सिंगही करणार आहे लग्न, जाणून घ्या ती कोणासोबत घेणार आहे फेरे ?

एका ओटीटी अ‍ॅपवरील कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सोनालीने या अफवेबद्दल सांगितलं. तुझ्या आयुष्यातली आतापर्यंतची सगळ्यात वाईट अफवा कोणती असं विचारल्यावर सोनाली म्हणाली, ‘माझं लग्न झालंय आणि तेही एका राजकीय नेत्यासोबत. त्याने मला घर दिलंय आणि त्या घरात मी राहते अशा अफवा पसरलेल्या.

ही अफवा माझ्या आयुष्यातली वाईट अफवा होती.’ त्यावर शेजारी बसलेला अभिनेता आशय कुलकर्णी म्हणतो, ‘खरंच?’ सोनाली म्हणते, ‘हो. मला माझ्या चुलत बहिणीचा फोन आला आणि ती मला म्हणाली की आम्ही असं ऐकलंय तू लग्न केलंस. मी म्हणाले, माझं लग्न असेल तेव्हा तुला आमंत्रण देईन ना . त्यावर ती म्हणाली की नाही राहून गेलं असेल घाई गडबडीत. मी म्हटलं असं कसं राहील? काहीही काय बोलतेस, मग तिने सांगितलं की नेत्यासोबत लग्न झालंय असं म्हटलं जातंय. त्याने घर दिलंय. मी थोडावेळ स्तब्ध झाले होते.’

सोनालीने यापूर्वी दिलेल्या एका पॉडकास्टमध्येही या गोष्टीचा उल्लेख केला होता. कोल्हापूरमधील एका नेत्यांशी सोनालीचं लग्न झालंय आणि त्याने तिला राहायला घर दिलंय अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्या नेत्याच्या विरोधकांनी त्याला बदनाम करण्यासाठी ही अफवा पसरवली होती.

हे वाचा:   “१८ वर्षांपूर्वी मी आईला गमावलं आता…”; प्रसिद्ध अभिनेत्रीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान

मात्र त्यात सोनालीचं नाव कसं आलं हे आजवर तिला ठाऊक नसल्याचं तिने सांगितलं होतं. या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तिने अभिनेता सुशांत शेलार याची मदत घेतली होती.

Leave a Reply