`या` कारणामुळे करीना कपूरचा अजयला किस करण्यास नकार, म्हणाली; मी फक्त सैफ सोबतच…

Uncategorized

अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकाराल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. आजही या जोडीच्या चर्चा सर्वत्र पसरलेल्या असतात. पण तुम्हाला माहिती आहे एका चित्रपटात करीनाने अजयला किस करण्यास नकार दिला होता. 

   

अजय देवगण आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्यांच्या जवळपास सर्वच चित्रपटांनी पडद्यावर अप्रतिम काम केलं आहे. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते. तसं, अजयने करिनाची मोठी बहीण करिश्मासोबतही पडद्यावर रोमान्स केला आहे.

‘ओमकारा’ या चित्रपटामध्ये दोघांनी इंटीमेट सीन दिले होते. या चित्रपटातील करीना कपूरच्या भूमिकेचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. त्यानंतर तिने रोहित शेट्टी सोबतही गोलमालमध्ये काम केलेलं आहे. करीना कपूरने त्यानंतर सैफ अली खानसोबत ‘कूरबान’ या चित्रपटातही काम केलं. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचा प्रचंड वाद झाला होता. कारण दोघांनी खूपच बोल्ड फोटोशूट करून पोस्टर तयार केलं होतं. ज्यामुळे याचा अनेकांनी विरोध केला होता.

हे वाचा:   डीप नेक अन् बॅकलेस गाऊन झेपेना ! सिड-कियाराच्या रिसेप्शनला जिनिलिया वहिनी ट्रोल

त्यानंतर 2013 मध्ये प्रकाश झा यांनी सत्याग्रह या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि करीना कपूर यांची जोडी होती. एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान दोघांमध्ये इंटिमेट सीन करायचा होता. मात्र, करीना कपूरने हा सीन करण्यास नकार दिला. कारण  त्यावेळेस करीना कपूरचं सैफ अली खानसोबत लग्न झालं होतं. त्यामुळे तिने हा सीन करणार नाही, असं सांगितलं होतं.

करीना कपूर आणि अजय देवगण यांनी रोमँटिक सीनमध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. पण असाही एक किस्सा आहे जेव्हा अभिनेत्रीने अजयला ऑनस्क्रीन किस करण्यास नकार दिला होता. ओंकारामध्ये दोघांनी खूप बोल्ड सीन्स दिले होते. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2013 मध्ये आलेल्या सत्याग्रह चित्रपटात करीना कपूर आणि अजय देवगणच्या लिप लॉक किसचा एक सीन होता, जो करीनाने करण्यास नकार दिला होता.

हे वाचा:   “आमचं मिशन पूर्ण झालं”; भगव्या बिकिनीवरील वादादरम्यान ‘पठाण’चे दिग्दर्शक असं का म्हणाले?

जर मीडियावर विश्वास ठेवायचा झाला तर, सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना कपूरला किसिंग सीन शूट करताना कर्म्फर्टेबल वाटत नव्हतं. करीना कपूरने प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या चित्रपटातील किसींग सीनसाठी स्पष्ट नकार दिला होता. आजपर्यंत करीना किंवा अजय देवगण यांनी या गॉसिप्सला दुजोरा दिला नसला तरी ही केवळ अफवा असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply