लग्नाची परंपरा कशी आणि कोणी सुरू केली? पृथ्वीवर पहिलं लग्न कोणी केलं माहितेय

Uncategorized

लग्नाचा मोसम आपण सर्वजण खूप एन्जॉय करतो. लग्न केवळ दोन अनोळखी लोकांना एकत्र करत नाही तर त्यांच्या कुटुंबांना देखील एकत्र करते. लग्नाबाबत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येत असेल की पृथ्वीवर पहिल्यांदा लग्न करणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण होत्या?

   

हिंदू धर्मात लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील नाते नसून दोन कुटुंबांचे मिलन असते. लग्नादरम्यान अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात. सध्या आपल्या देशातही लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नांमुळे सध्या आजूबाजूला बँड आणि डीजेचा आवाज अनेकदा ऐकू येतो. हिंदू धर्मात लग्नाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते,

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लग्नाचे विधी कोणी तयार केले? ही परंपरा कोठून सुरू झाली असावी आणि पृथ्वीवर पहिल्यांदा कोणाचे लग्न झाले? जर नसेल तर जाणून घेऊया भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून.

हे वाचा:   Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेचा रुद्रावतार; निम्रतवर 'असा' काढला राग

पृथ्वीवरील पहिले जोडपे हिंदू धर्माच्या पौराणिक कथेनुसार, जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झाली तेव्हा भगवान ब्रह्मदेवानं आपल्या शरीरातून दोन तुकडे निर्माण केले, एका तुकड्याचे नाव “का” आणि दुसऱ्या तुकड्याचे नाव “या” ठेवले. या दोघांनी मिळून शरीराची काया निर्मिती केली आणि या कायेतून स्त्री-पुरुष घटकांचा जन्म झाला.

स्वयंभू मनू आणि शतरूपा हे पहिले जोडपे ठरले – पुरुष तत्वाला स्वयंभू मनु असे नाव देण्यात आले आणि स्त्री तत्वामध्ये जन्मलेल्या पहिल्या स्त्रीचे नाव शतरूपा ठेवण्यात आले. हिंदू धर्मात मनु आणि शतरूपा हे पृथ्वीवरील पहिले मानव मानले जातात. जेव्हा दोघेही पृथ्वीवर प्रथमच आमनेसामने आले, तेव्हा त्यांना ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या विधी आणि कौटुंबिक ज्ञानातून वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याची दिशा मिळाली.

हे वाचा:   Incredible India : हिंदुस्तानचं शेवटचं दुकान... इथं चहा पिणं म्हणजे स्वर्गसुख!

लग्नाचे नियम कसे बनवले – हिंदू धर्मातील काही धार्मिक पुराणांमध्ये असे म्हटले जाते की, विवाहाची सुरुवात श्वेत ऋषींनी केली होती. श्वेत ऋषींनीच लग्नासाठी परंपरा, नियम, प्रतिष्ठा, लग्नाचे महत्त्व, सिंदूर, मंगळसूत्र आणि सात फेऱ्यांसह सर्व प्रकारच्या प्रथा प्रस्थापित केल्या. श्वेत ऋषींनी बनवलेल्या नियमांमध्ये लग्नानंतर पती-पत्नीला समान दर्जा देण्यात आला आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Leave a Reply