अभिनेत्री नोरा फतेहीनं अप्रतिम डान्समुळं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बर्थडे गर्ल नोराला डान्सिंग सेन्सेशन म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नोरा बॉलिवूड सिनेमांमध्ये आयटम सॉंग करताना दिसते. तिला ‘दिलबर’ गर्ल असंही म्हटलं जातं. ग्लॅमरस नोरा बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते. नोरा आता अनेक टीव्ही शोमध्ये परिक्षकाच्या खुर्चीत दिसत असली तरी, तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.
नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला. नोरा कॉलेजमध्ये शिकत असतानाच डान्स शिकली. युट्यूबवर व्हिडिओ पाहून ती कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय बेली डान्समध्ये पारंगत झाली. नोराला डान्ससोबतच मॉडेलिंगमध्येही रस होता.नोरा जेव्हा कॅनडाहून भारतात आली होती तेव्हा, तिच्याकडं फक्त ५००० रुपये होते. सिनेसृष्टीतीत येण्यापूर्वी तिनं बराच संघर्ष केलाय. याबद्दल तिनं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय.
एका मुलाखतीत नोरानं सांगितलं होतं की, आयुष्यात एक काळ असाही होता की, पोट भरण्यासाठी ती कॉफी शॉपमध्येकाम करायची. तिनं कॉलसेंटरमध्ये टेलीकॉलरची नोकरीही केली होती. या नोकरीत ती लॉटरीची तिकिटे विकायची. सहा महिने काम करून तिनं ती नोकरी सोडली होती.
आता नोरा बॉलिवूडमधलं मोठ्ठं नाव आहे. एका गाण्यासाठी ती कोट्यवधींचं मानधन घेते. नोरानं २०१४मध्ये ‘रोर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘बिग बॉस’च्या ९ व्या पर्वात झळकल्यानंतर नोरा विशेष चर्चेत आली.
खासगी आयुष्याची चर्चा
नोरा बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिचं नाव अनेकांशी जोडलं गेलं.नोरानं नेहा धुपियाचा पती अंगद बेदीला डेट केलं होतं . बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झालं होत. तसंच काही महिन्यांपूर्वी २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुरेश चंद्रशेखरमुळं ती अडचणीत सापडली आहे.