मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकत्याच भेटीला आलेल्या रानबाजार या वेब सिरीज मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही वेबसिरीज प्रचंड गाजली. सोज्वळ गोंडस प्राजक्ताने बोल्ड पात्र साकारलेलं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी नुकताच प्राजक्ता लंडन दौरा करून आली. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती परदेशी गेली होती. तिथले काही फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. यावेळीच तिने शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांना बुचकळ्यात टाकलं. प्राजक्ताने एका मिस्ट्री बॉयसोबत कॉफी डेटवर गेल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. या व्यक्तीसोबत तिने फोटो शेअर केला आहे. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.
खरंतर प्राजक्ताने ही पोस्ट वर्ल्ड फूड डे निमित्ताने शेअर केली होती. यावेळी तिने तिचे आणि काही पदार्थांचे भन्नाट फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्या सोबतच तिने आणखी एक फोटो शेअर केला ज्यात ती एका मुलासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘वर्ल्ड फूड डेच्या शुभेच्छा. त्या व्यक्तीचं देखील खूप कौतुक केलं. जो फक्त तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्यासोबत जेवणासाठी पुणे मुंबई असा प्रवास करतो. खूप खूप धन्यवाद भावा.’ ही पोस्ट जरी जूनी असली तरी सोशल मीडियावर ही पोस्ट पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
प्राजक्ताच्या या पोस्टवरून हा व्यक्ती तिचा चाहता असल्याचं स्पष्ट होतंय. हा चाहता केवळ प्राजक्ताला पाहण्यासाठी एवढ्या दूर प्रवास करून आला होता. त्यांच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. तुला भेटण्यासाठी तुझे चाहते काहीही करू शकतात, असं म्हणत काही नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.
आपले आवडते मराठी कलाकार कधी विवाहबंधनात अडकत आहेत याबद्दल त्यांची उत्सुकता कायम शिगेला असते. आपल्या मोहक अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीही कधी लग्न करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांनी कायम पडतो. आता अभिनेत्री लग्न कधी करते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.