Shark Tank: ‘पैसे तर दिलेच नाहीत उलट..’, शार्क टँकच्या परीक्षकांवर स्पर्धकाचा गंभीर आरोप

Uncategorized

छोट्या पडद्यावर सध्या जोरदार चर्चेत असलेला शो म्हणजे शार्क टॅंक होय. या शोच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना व्यवसायात पाय रोवण्यासाठी गुंतवणूक केली जाते. यामध्ये अनेक प्रसिद्ध उद्योजक परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेले दिसून येतात जे या गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतात. सध्या या शोचा दुसरा सीजन सुरु आहे. हा शो गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान आता या शोमधील परीक्षक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. एका स्पर्धकाने त्यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे.

   

‘शार्क टॅंक’ या शोची थीम सर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या शोच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आपल्या उद्योजकीय कल्पना फुलविण्यास मदत मिळत आहे. या शोचा पहिला सीजन प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे आता दुसरा सीजन सुरु करण्यात आला आहे. दरम्यान पहिल्या सीजनच्या एका स्पर्धकाने या शोमधील परीक्षकांवर फसवणुकीचा गंभीर आरोप करत सर्वांनाच चकित केलं आहे.

हे वाचा:   Video: बापरे! चक्क नागासमोर ‘माकड’चाळे, शेपटी ओढल्यानंतर नागाने काढला फणा अन्…; पाहा Viral व्हिडीओ

पहिल्या सीजनमधील स्पर्धक आणि IWebTechno चे संस्थापक असलेले अक्षय शाह यांनी आपल्या ट्विटमधून याबाबत खुलासा करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते याशोमधील दोन परीक्षकांनी त्यांना गुंतवणूक करण्याचा आश्वासन देऊन नंतर पलटी मारली आहे. त्यांनी आश्वासन देऊनसुद्धा तसं न केल्याचं अक्षय यांचं म्हणणं आहे. त्यांनी शोनंतर आपला विचार बदलला असून त्यांचं वागणं बदललल्याचसुद्धा अक्षय यांनी सांगितलं आहे.

शार्क टॅन्कच्या परीक्षकांवर आरोप करत अक्षय यांनी सांगितलं की, ‘शार्क टॅंक हा शो संपल्यानंतर यातील परीक्षक मला कधीही भेटले नाहीत. त्यांनी मला कोणतेच गुंतवणुकीचे पैसे दिलेले नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांनी माझ्या कोणत्याच मेलला उत्तरसुद्धा दिलेलं नाहीय.

हे वाचा:   तिहार तुरुंगातून प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाची मागणी; धक्कादायक घटनेनंतर ‘ती’ वादाच्या भोवऱ्यात

दरम्यान अनेक नेटकऱ्यांनी अक्षय यांना तुम्ही थेट नावासह का त्यांना विचारत नाही असे विचारलं असता, त्यांनी आपल्याला भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. आपल्यासोबत पहिल्या सीजनमधील जवळजवळ 50 टक्के स्पर्धकांना हाच अनुभव आल्याचं सांगितलं आहे.

Leave a Reply