कॉमेडीतील दोन बाप माणसं येणार एकत्र…, भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवायला सज्ज

Uncategorized

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता आणि कॉमेडी वीर ओंकार भोजनेनं (Onkar Bhojne) काही दिवसांपूर्वीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा शो सोडला. या शोमधून बाहेर पडल्यानंतर ओंकारनं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर ओंकार एकांकिका करू लागला होती. आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी ओंकारनं ‘करून गेलो गाव’ (Karun Gelo Gava) हे भन्नाट विनोदी नाटक निवडलं आहे.

   

ओंकारला नाटक करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, यावेळी त्यांना ओंकारसोबत आणखी एक सुखद धक्का मिळणार आहे. आता हा सुखद धक्का म्हणजे काय असेल असा प्रश्न ज्यांना पडला आहे, त्यांच्यासाठी चला जाणून घेऊया काय आहे हा सुखद धक्का…

ओंकारसोबत यावेळी ‘चला हवा येऊद्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शोनं सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा विनोद वीर भाऊ कदम (Bhau Kadam) दिसणार आहे. त्यामुळे आता दोन विनोद वीर जेव्हा रंगमंचावर एकत्र येतील तेव्हा काय कल्ला होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज आहेत. ते दोघं ‘करून गेलो गाव’ या मालवणी नाटकात दिसणार आहे. खरंतर हे दोघं ‘करून गेलो गाव’ या नाटकाला नव्यानं रंगभूमीवर घेऊन येणार आहेत. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या नाटकाची निर्मिती ही दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि राहुल भंडारे (Rahul Bhandare) करणार आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेश देशपांडे (Rajesh Deshpande) यांनी केले आहे.

ओंकार भोजनेनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण त्यानं तडकाफडकी आणि अचानक या शोला रामराम ठोकला. त्यामुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या सगळ्या चाहत्यांना प्रश्न पडला होता की ओंकारनं नक्की असं का केलं. मात्र, कोणालाही काही कळलं नाही. शोमधून बाहेर पडल्यानंतर ओंकार काही दिवसांनी फू बाई फू या शोमध्ये दिसला होता. मात्र, शोला जो अपेक्षीत होता तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता ओंकारसोबत नाटकात भाऊ कदम देखील दिसणार आहे. त्यामुळे आता हे दोघं मिळून रंगमंचावर काय धम्माल करणार आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

हे वाचा:   अभिनेत्री दिया मिर्झाने घेतला हॉटेल धसका म्हणाली, 'एक वेळ अंघोळ करतानाचा व्हिडिओ....'

दरम्यान, याशिवाय ओंकारच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सरला एक कोटी या चित्रपटात तो दिसला होता. ओंकारनं महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका सोडल्यानंतर ओंकार सिनेमा आणि शो करत असताना त्यानं स्वत: ला एकांकीकेपासून दूर केलं नाही. त्यामुळे आता तो नाटकात दिसणार आहे. आता नाटकांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

Leave a Reply