दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून सोबत राहत होता हा अभिनेता, 20 वर्षांनी बसला धक्का; काय आहे नेमका प्रकार?

Uncategorized

बॉलिवूडमधील (Bollywood) 90 च्या दशतकातील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये दीपक तिजोरी (Deepak Tijori) हे एक नाव नक्की घेतलं जातं. दीपक तिजोरीला मुख्य अभिनेत्यापेक्षा सहकलाकार म्हणून जास्त प्रसिद्धी आणि यश मिळालं. 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये हिरोचा मित्र, भाऊ, व्हिलन अशा भूमिकांमध्ये दिसत होता. ‘कभी हां कभी ना’, ‘जो जिता वही सिकंदर’, ‘आशिकी’, ‘गुलाम’ असे काही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड गाजले. पण नंतर अनेक मोठे अभिनेते जोडीने काम करु लागल्याने दीपक तिजोरीला मिळणाऱ्या भूमिका कमी होऊ लागल्या. यानंतर दीपक तिजोरीचा खऱा संघर्ष सुरु झाला होता. पण दीपक तिजोरीचा संघर्ष फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर खऱ्या आयुष्यातही सुरु होता. दीपक तिजोरीने आपल्या पत्नीला घटस्फोट (Deepak Tijor Divorce) दिल्यानंतर बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली होती. हा घटस्फोट साधारण नव्हता, तर यामागे एक मोठं कारण होतं जे समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

   

बॉलिवूडमधील अनेक जोड्या एकत्र आल्यानंतर त्यांचे घटस्फोट झाल्याची प्रकरणं तशी काही नवीन नाहीत. घटस्फोट झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपक तिजोरीचं नावही समाविष्ट आहे. पण जेव्हा दीपक तिजोरीने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा आपण ज्या पत्नीसह गेल्या 20 वर्षांपासून राहत आहोत ती आपली पत्नीच नसल्याची धक्कादायक माहिती दीपक तिजोरीला मिळाली होती. 2017 ला दीपक तिजोरीच्या पत्नीने त्याला घराबाहेर हाकलून दिलं होतं. पण त्यावेळी असे काही खुलासे झाले होते जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

हे वाचा:   Pushpa 2 मध्ये होणार डबल धमाका! अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा हा सुपरस्टार

सत्य समोर आल्यानंतर बसला होता धक्का

दीपक तिजोरी आणि त्याची पत्नी शिवानी तोमर यांच्या नात्यात काही काळापासून सर्व काही ठीक नव्हते. दीपक तिजोरीचं इतर महिलांसह अफेअर सुरु असल्याचा पत्नीचा दावा होता. दुसरीकडे दीपक तिजोरीनेही पत्नीवर कायदेशीर कारवाईसाठी तयारी सुरु केली होती. यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली होती. शिवानी तोमरने अद्याप आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिलाच नसल्याची माहिती दीपक तिजोरीला मिळाली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. 

20 वर्षांनी बसला धक्का

दीपक तिजोरी आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची तयारी करत असतानाच त्याला आपण जिला 20 वर्षांपासून आपली पत्नी मानत आहोत तिने अद्याप पहिल्या पतीला घटस्फोटच दिला नसल्याचं समजलं. पत्नीचा घटस्फोट झालेला नसतानाच दीपक तिजोरीने तिच्याशी लग्न केलं होतं. यामुळे शिवानी तोमर ही दीपक तिजोरीची कायदेशीर पत्नी नव्हती. कारण कायद्यानुसार दुसरं लग्न करायचं असेल तर पहिल्या पती किंवा पत्नीला घटस्फोट देणं बंधनकारक आहे. पण शिवानी तोमरचा घटस्फोट झाला नसल्याने चांगलाच गदारोळ सुरु झाला होता. 

हे वाचा:   ऐश्वर्यालाही टक्कर देणारी 'सिर्फ तुम'ची अभिनेत्री सध्या काय करते? आता कशी दिसते?

दीपक तिजोरीने 1988 मध्ये ‘तेरा नाम मेरा नाम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दीपक तिजोरीने 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून, दिग्दर्शनही केलं आहे. मुख्य अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या दीपक तिजोरीला यश मिळालं, मात्र ते सहकलाकार म्हणूनच. त्याचं मुख्य भूमिकेत यशस्वी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलंच नाही. 

Leave a Reply