नशेत तर्र जॅकी श्रॉफ यांनी त्या रात्री तब्बूसोबत केलं असं काही; अभिनेत्रीने घेतली ‘ही’ शपथ

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. जुन्या चित्रपटांमध्येच नाही तर आताही तब्बूचा करिश्मा आताही कायम आहे. भुलभुलैय्या, दृश्यम २ या चित्रपटात दमदार भूमिका करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. आजही ती अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग आहे.

   

तब्बू  अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी तिची मोठी बहीण फराह देखील बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. त्यांनी अनेक मोठ्या  चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशा परिस्थितीत फराह अनेकदा तब्बूला बॉलीवूडच्या मोठ्या पार्ट्यांमध्ये आणि शूटिंगसाठी घेऊन जायची.बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते तब्बू आणि जॅकी श्रॉफ मध्ये घडलेल्या एका प्रसंगाची अजूनही चर्चा होते. काय झालं होतं त्या रात्री नक्की जाणून घ्या.

एकदा तब्बू मोठी बहीण फराहसोबत पार्टीला गेली होती, जिथे अभिनेत्रीसोबत असे काही घडले की तिला धक्काच बसला. हे बॉलिवूडचा अभिनेता जॅकी श्रॉफशी संबंधित आहे. या पार्टीत असे काही घडले की तिने पुन्हा कधीही जॅकी श्रॉफसोबत काम न करण्याची शपथ घेतली. गोष्ट 1986 ची आहे, तब्बूची मोठी बहीण जॅकी श्रॉफसोबत ‘दिलजला’मध्ये काम करत होती. त्याच वेळी, या चित्रपटात अभिनेता डॅनी खलनायकाच्या भूमिकेत होता.

हे वाचा:   तुझ्यासारखे किती आले आणि गेले; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मनासी नाईकची नवी पोस्ट चर्चेत

चित्रपटाचे शूटिंग संपले की सगळे डॅनीच्या घरी पार्टीला जायचे. एके दिवशी अशाच एका पार्टीत फराहने तब्बूला सोबत घेतले. या पार्टीत जॅकीला पाहून सगळेच थक्क झाले. फराहने एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. तिने सांगितले होते की, जेव्हा ती पार्टीसाठी डॅनीच्या घरी पोहोचली तेव्हा जॅकी श्रॉफही तिथे होता. यादरम्यान जॅकीने खूप जास्त दारू प्यायली होती. दारूच्या नशेत त्यांनी तब्बूसोबत गैरवर्तन केले होते, अशावेळी डॅनीने येऊन तब्बूला वाचवले.

मात्र, तब्बूने या घटनेचा कधीही उल्लेख केला नाही आणि या वृत्तांना दुजोराही दिला नाही. पण, मीडियामध्ये या घटनेची बरीच चर्चा झाली. फराह म्हणाली होती कि, ‘जर डॅनी बचावासाठी आला नसता, तर जॅकीने काय केले असते ते कळले नसते.’ फराहच्या या विधानाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती.

हे वाचा:   दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा,या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे दुःखत निधन

दुसरीकडे, तब्बूने कधीही जॅकीसोबत काम केले नाही. सार्वजनिक ठिकाणीही दोघे एकमेकांसमोर आले तर ते एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले.तब्बू आणि जॅकी श्रॉफ मध्ये घडलेल्या या प्रसंगाची अजूनही चर्चा होते. खरं काय, खोटं काय हे मात्र अजूनही गुपितच राहिलं आहे.

Leave a Reply