ना भांडण, ना मतभेद; तरीही 28 वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळी राहते गायिका; कारण वाचून वाईट वाटेल

Uncategorized

90च्या दशकातील आपल्या सुंदर आवाजानं प्रेक्षकांना घिळवून ठेवणारी गायिका म्हणजे अलका याग्निक. गाण्याव्यतिरिक्त अलका याग्निक तिच्या लव्ह स्टोरीमुळेही चर्चेत राहिली. रेल्वे स्टेशनवर झालेली ओळख आणि नंतर प्रेम, लग्न. पण एकेदिवशी अचानक तुटलं होतं लग्न. काय आहे यामागचं कारण पाहूया.

   

‘तुमसा कोई प्यारा’, ‘बड़ी मुश्किल है’, ‘तेरी चुनरिया’, ‘ये बंधन तो’, ‘टिप-टिप बरसा पानी’, ‘बोले चुड़िया’ सारख्या गाण्यांनी अलका याग्निक यांनी 90च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.अलका यांनी वयाच्या 6व्या गाणं गाण्यास सुरूवात केली. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. 6व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं.

वयाच्या 10व्या अलका आईबरोबर मुंबईत आल्या. इथे त्यांची ओळख राज कूपरबरोबर झाली. त्यांनी अलकाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशी ओळख करून दिली.14व्या वर्षी अलका यांनी ‘पायल की झंकार’ सिनेमात ‘थिरकत अंग लचक झुकी’ हे गाणं गायलं.

हे वाचा:   महागड्या गाड्या अन् लॅव्हिश लाईफस्टाईल, मुंकेश अंबानींच्या सूनेकडे आहे 'इतकी' संपत्ती

अलका आणि त्यांचा पती नीरज कपूर यांची लव्ह स्टोरी फार रंजक होती. दोघांची पहिली भेट रेल्वे स्टेशनवर झाली होती.नीरज हे शिलांगमधील एक बिझनेसमन आहेत. 1989मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर काही काळच ते एकत्र राहिले.

मीडिया रिपोर्टनुसार, दोघांमध्ये कोणतेही मतभेद किंवा भांडण नव्हतं. तरीही दोघे एकमेकांपासून मागील 28 वर्षांपासून दूर राहत आहेत.अलका आणि नीरज त्यांच्या कामामुळे मागची 28 वर्ष वेगवेगळे राहत आहेत. अलका या जास्तकरून मुंबईत असतात तर नीरज बिझनेससाठी शिलॉंगमध्ये असतात.

दोघेही एकमेकांसाठी वेळ काढून भेटतात. लाँग डिस्टन्स रिलेशनमध्येही दोघांचा संसार सुखाचा झाला.त्यांना एक मुलगी आहे. जिचं नाव आहे स्येशा कपूर. स्पेशाचं लग्न देखील झालंय.

Leave a Reply