रंगावरून ट्रोल होणारं हे स्टायलिश जोडपं आहे कोण? ८ वर्षांपासून करत होते एकमेकांना डेट

Uncategorized

सध्या सोशल मीडियावर एका सुंदर कपल्सचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. हे दोघं नक्की कोण आहेत याबाबत बऱ्याच लोकांना कल्पना नाही. हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एटली कुमार आहेत आणि ती त्यांची पत्नी प्रिया आहे. शाहरूखचा अपकमिंग सिनेमा जवानचे ते दिग्दर्शक आहेत.

   

इंडीयन लूक असो किंवा वेस्टर्न हे दोघंही एकमेकांना कॉम्पलिमेंटस देतात. लग्नाआधी या दोघांनी एकमेकांना ८ वर्ष डेट केलं. अलिकडेच प्रियानं एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

एटली शाहरुख खानसोबत चित्रपट बनवत आहे. मल्याळम सिनेमात एटली खूप लोकप्रिय आहेत. राजा राणीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा विजय पुरस्कारही मिळाला आहे.

तो सामान्य उंचीचा, पातळ शरीराचा आणि गडद रंगाचा दिसतो आणि यामुळे त्याला अनेकदा ट्रोल देखील केले जाते. पण त्याची प्रतिभा विलक्षण आहे. एवढ्या लहान वयातही एटली यांनी स्वबळावर असे स्थान मिळवले आहे, जे कौतुकास्पद आहे.

हे वाचा:   आलिया-रणबीरच्या मुलीचं नाव आहे खूपचं खास, अर्थ माहितीये का?

एटली कुमार यांनी दिग्दर्शनात पदार्पण करण्यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक एस शंकर यांच्यासोबत पाच वर्षे काम केले. त्यांनी त्यांचे प्रोडक्शन हाऊस ऍपल प्रॉडक्शन सुरू केले आणि फॉक्स स्टार स्टुडिओसह ‘सांगिली बुंगीली काधवा थोरे’ हा पहिला चित्रपट बनवला.

एटली यांनी 2014 मध्ये अभिनेत्री कृष्णा प्रियासोबत लग्न केले. दोघेही जवळपास 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर या नात्याला लग्नाचे नाव देण्यात आले. 2014 मध्ये झालेल्या त्यांच्या लग्नाला दक्षिण भारतातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कृष्णा प्रिया ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

एटली कुमार बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ‘बिगिल’ या मल्टिस्टार चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला. एटली यांची पत्नी देखील अभिनेत्रीसोबतच बिझनेसवुमन देखील आहे

हे वाचा:   अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? स्टार कपल हॉस्पिटलबाहेर झालं स्पॉट

एटलीचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे आणि ते अतिशय विलासी जीवन जगतात.त्याच्याकडे अनेक आलिशान वाहनांचा संग्रह आहे.

Leave a Reply