आमिर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शिनिस्ट म्हणून संबोधलं जातं. मात्र एक काळ आमिर खान त्याच्या किसिंग सीनसाठी चर्चेत होता. जुही चावलासोबत ‘कयामत से कयामत तक’ ते ‘राजा हिंदुस्तानी’मध्ये करिश्मा कपूरला घेतलेल्या किसची जोरदार चर्चा रंगली होती.
पण एका चित्रपटात किसिंग सीन देताना मिस्टर परफेक्शिनिस्ट आमिर खान याला घाम फुटला होता. 1995 मध्ये दिग्दर्शक दिलीप शंकर यांनी आमिर खानची ‘आतंक ही आतंक’ या चित्रपटासाठी आमिर खानला साईन केलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत जुही चावला आणि रजनीकांत मुख्य भूमिकेत होते.
या चित्रपटात पूजा बेदीने एक छोटीशी भूमिका साकारली होती. पण पूजा बेदीला किस करताना मिस्टर परफेक्शिनिस्ट आमिर खानला अस्वस्थ वाटत होतं.आमिरचा एक इंटिमेट लव्ह मेकिंग सीन पूजासोबत शूट होणार होता.
आमिर आणि पूजा या दोघांनाही या सीनवर कोणताही आक्षेप नव्हता. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या दिग्दर्शकाला हा सीन ज्या पद्धतीने शूट करायचा होता हे जाणून दोघांनाही धक्का बसला. हा सीन 100 लोकांसमोर शूट केला जाणार होता.
एका मुलाखतीदरम्यान पूजा बेदी हिनं सांगितलं होतं की, ‘आतंक ही आतंक’ या चित्रपटात मी पाहुणी कलाकार होती. आमिर आणि मी याआधी जो जीता वो सिकंदरमध्ये एकत्र किसिंग सीन दिला होता. हा लव्ह मेकिंग सीन आम्ही 100 लोकांसमोर शूट केला. शूटिंगनंतर आमिर खान आणि मी खूप अस्वस्थ झालो.
अशा परिस्थितीत निर्मात्यांनी आम्हाला एका खोलीत बसवले. मी आणि आमिर खान खोलीत काही मिनिटे गप्प बसलो होतो. शेवटी आमिर खानने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला चला बुद्धिबळ खेळू आणि आम्ही पुन्हा बोलू लागलो.
इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता पण नंतर तो चित्रपटातूनच काढून टाकण्यात आला. हा किसिंग सीन चित्रपटात असता तर गदारोळ झाला असता.