Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

Uncategorized

अभिनेत्री शिवाली परब ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. शिवालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अफलातून अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. शिवाली ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

   

‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात प्रेक्षकांना शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे रोमॅंटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात शिवालीने लिपलॉकिंग सीन दिले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणाऱ्या शिवालीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही अवाक आहेत.

शिवाली परब मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातून गावातील थरारक प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटात शिवाली मालवणी भाषा बोलताना दिसत आहे. चित्रपटात अगदी साध्या दिसणाऱ्या शिवालीचा गाण्यातील बोल्डनेस पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हे वाचा:   कोमट पाणी कोणी प्यावं, कोणी पिवू नये? डॉक्टर देतात मोलाचा सल्ला...

अभिजीत वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात शिवालीसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी केली आहे.

Leave a Reply