विवाहित लोक विवाहबाह्य संबंधांत का अडकतात? ही आहेत ३ मोठी कारणं

Uncategorized

लग्ना हा प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यापैकी एक आहे. या दिवसानंतर खरंतर दोघांचंही आयुष्य बदलतं, कारण यानंतर जबाबदारी वाढते. तसेच मुलीसाठी खरंतर तारेवरची कसरत असते. कारण तिला नवीन घरी, नवीन लोकांमध्ये जायचे असते. तेथील चालीरिती सांभाळून घर चालवायचं असतं.

   

नवरा-बायको दोघंची संसार चालवणारे महत्वाची चाक आहेत. त्यामुळे ते कितीही भांडले, तरी त्यांनी एकत्र राहाणं आणि वाद संपवणं महत्वाचं आहे.

लग्नानंतर नवरा-बायकोचं नातं विश्वासाच्या नाजूक तारेवरचं टिकून असतं. विश्वासात थोडी घट झाली तर वैवाहिक जीवनात दरारा निर्माण होतो. पण जेव्हा विवाहित जोडप्यामध्ये अचानक तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होते तेव्हा मात्र संसाराटी घडी बिघडते.

आजूबाजूला तुम्ही काही असे लोक पाहिले असतील जे लग्न होऊनही विवाहबाह्य संबंधात अडकतात. पण असं का करतात? असं करण्यामागे त्यांची मानसिकता काय असू शकते? असा अनेकांना प्रश्न पडतो. चला या प्रश्नाची काही उत्तर एक्पर्टसच्या मार्फत समोर आली आहेत. ती जाणून घेऊया. कदाचित याची उत्तर जाणून घेतल्यावर एखाद्याला त्यांचा संसार वाचवण्यात मदत मिळू शकते.

हे वाचा:   अंबानी कुटुंबाचा रॉयल थाट, दिवाळीआधी खरेदी केल्या दोन Rolls Royce, पाहा कशा आहेत लग्झरी कार्स

जोडीदाराकडे लक्ष न देणे

स्त्री असो वा पुरुष, लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात लाइफ पार्टनरचा सहभाग नसेल तर एकटेपणाची भावना येऊ शकते. यात जोडीदाराकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक नातं तुटण्याच्या दिशेने वळतं. नवरा असो किंवा बायको आपल्या प्रत्येक कामाची स्तुती व्हावी असं वाटतं, त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिलं गेलं नाही तर आत्मविश्वास कमी होऊ लागतो.

अशा परिस्थितीत ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपला आनंद शोधू लागतात आणि जर आपल्या जोडीदारापेक्षा कोणी दुसरा व्यक्ती आपल्याकडे जास्त लक्ष देतोय, हे पाहून अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. मग इथूनच विवाहबाह्य संबंधांना सुरुवात होते.

भावनिक आधाराची इच्छा

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नवीन लग्न होते, तेव्हा नवरा-बायको एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी देखील दर्शवतात. पण जसजसा काळ सरत जातो तसतसे भावनिक आसक्ती कमी होऊ लागते, अनेक वेळा आयुष्यात वाईट किंवा कठीण प्रसंग अला तर, त्या व्यक्तीला कोणाच्या तरी आधाराची गरज असते.

हे वाचा:   Urfi Javed च्या अंगावर एकही कपडा नाही; शरीरावर चक्क गुंडाळली सायकलची चैन- व्हिडिओ व्हायरल

आपल्या जोडीदाराने त्यांना समजून घ्यावे अशी इच्छा असते. पण जर समोरील जोडीदार हे सगळं न करता लांब पळत असेल, तर भावनिक आधारासाठी त्यांना दुसरी व्यक्ती सापडते, ज्यांच्याकडे ते आकर्षित होतात.

वैवाहिक जीवनात कटुता

विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन व्यवस्थित सुरु नसल्याने अनेकदा बाहेरील व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण होतात. नात्यात कटुता आल्यानंतर प्रत्येकजण चांगल्या आयुष्याच्या शोधात असतो. त्यामुळे शक्यतो भांडण टाळा आणि आपल्या जोडीदाराला वेळ द्या. तसेच थोडफार त्याच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न करा.

नवरा-बायकोमध्ये दुरावा निर्माण होणं हे सामान्य आहे, पण ते दीर्घकाळ टिकवणं वाईट आहे, माफी मागून प्रकरण संपवता येतं. असं केलं नाही तर मात्र वेळ तुमच्या हातातून निघून जाईल.

Leave a Reply