अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? स्टार कपल हॉस्पिटलबाहेर झालं स्पॉट

Uncategorized

अभिनेत्री अनुष्का शर्मा काहि दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली होती. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांना उधाण आलं होतं. काहि जणांनी सांगितलं की, अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. तर काहिंनी सांगितलं की, या सगळ्या अफवा आहेत.

   

मात्र हे सत्य नाहीये की, विराट कोहली आणि अनुष्का दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. खरंतर अनुष्का हॉस्पिटलमध्ये का गेली होती यामागचं कारण समोर आलं आहे. हे कपल हॉलिडेवरुन परतल्यानंतर मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये गेले होते.

अनुष्का शर्मा लवकरच आपला येणारा सिनेमा चकदा एक्सप्रेसला घेवून व्यस्त आहे. हा सिनेमा भारतीय क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर झूलन गोस्वामीवर आधारित आहे. या सिनेमात ती स्पोर्ट्समॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. अशामध्ये अनुष्का शर्माही बॉलिंगचं जोरदार प्रशिक्षण घेत आहे. याच कारणामुळे अनुष्का शर्मा फिजिओथेरपिस्टकडे चेकअपसाठी पोहोचली होती.

हे वाचा:   टॉलीवूडमध्ये मोठी खळबळ; तब्बल 22 वर्षानंतर होणार थलपथी विजयचा घटस्फोट?

जरी या स्टार कपलचा हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओवरुनच पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सुट्टीवर गेले होते. अनुष्का शर्माने देखील व्हेकेशनमधील मोनोकिनीमध्ये बीचवरील फोटो शेअर केले आहेत.

या सुट्टीत ते मुलगी वामिकासह आले होते. सुट्टीवरून परतताच तो हॉस्पिटलमध्ये दिसला तेव्हा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या गॉसिप्स सुरू झाल्या. आता या गॉसिप्सला पूर्णविराम देत अनुष्का फिजिओथेरपिस्टला भेटायला आल्याची बातमी समोर आली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, चकदा एक्सप्रेसमधून अनुष्का शर्मा पुन्हा एकदा पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिचा शेवटचा सिनेमा चार वर्षांपूर्वी आला होता. जो २०१८मध्ये रिलीज झाला होता. अनुष्काने शाहरुख खानसोबत शेवट काम केलं आणि आता अनुष्का पुन्हा एकदा एक्टिंगमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.

Leave a Reply