दोन बायका फजिती ऐका! प्रसिद्ध यूट्यूबरच्या दोन्ही पत्नी सोबतच प्रेग्रेंट; फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ

Uncategorized

गेल्या काही वर्षांपूर्वी एका तरुणाने दोन जुळ्या मुलींशी लग्न केलं होतं. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. आता हा तरुण दोन्ही मुलींसोबत कसा संसार करणार, दोघी एकत्र कशा नांदणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनाच घर करुन गेले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओंनीही इंटनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. हा तरुण दुसरा तिसरा कुणी नसून प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक आहे. अशातच अरमानने आणखी एक गुडन्यूज दिली आहे.

   

यूट्यूबर अरमान मलिकने कृतिका मलिक आणि पायल मलिक या दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलं. आता या दोघी बहिणी प्रेग्नेंट आहे. दोघी बहिणींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली. कृतिका आणि पायलने बेबी बंप दाखवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे वाचा:   के एल राहुल-आथिया ला विराटने गिफ्ट केली खास कार, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दोघींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अरमानच्या दोन्ही बायका सोबतच प्रेग्नेंट असल्याचं समजताच चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

अरमान मलिकने पायल मलिकसोबत 2022 मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला एक मूल देखील आहे, ज्याचे नाव त्यांनी चिरायू मलिक ठेवले आहे. सहा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर, अरमान मलिकने 2018 साली कृतिका मलिकसोबत दुसरं लग्न केलं. आता दोघीही प्रेग्नंट असून अरमानसोबत सुखी आयुष्य जगत आहेत.

दरम्यान, कृतीका आणि पायल मलिकच्या प्रेग्नेंसीचे फोटो व्हायरल झाल्यामुळे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर कौतुकांचा वर्षावही होत आहे आणि सोबतच अनेकजण त्यांना ट्रोलदेखील करत आहेत.

अरमान मलिक त्याच्या दैनदिन आयुष्याविषयी अनेक व्हिडीओ बनवत असतो. त्याच्या आयुष्याशी अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचे यूट्यूबवर भरपूर फॉलोवर्स असून त्याचे व्लॉग कायम चर्चेत असतात.

Leave a Reply