साप समोर दिसल्यावर अनेकांच्या काळजाची धडधड वाढते. अशातच विषारी साप जवळ असल्यास पळता भूई झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर सापांसोबत मस्ती करतानाचे अनेक जणांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. सपांसोबत खेळ करणं अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पण काही बहादूर माणसं किंग कोब्रा सापाला घाबरत नाहीत आणि त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतात. पण एका व्हिडीओत सर्पमित्र नाही, तर चक्क एका लहान मुलानं किंग कोब्रा सापाची मान धरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अनेक माणसं पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसतात. लहान मुलांनाही मांजर, श्वानासोबत खेळायला आवडतं. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कारण एक लहान बाळ चक्क किंग कोब्रा सापासोबत खेळताना या व्हिडीओत दिसत आहे. साप जवळ आला की, भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण लहान मुलगा एवढ्या मोठ्या सापाची मान पकडतो, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
चिमुकल्यानं धरली सापाची मान
राजीबुल इस्लाम नावाच्या युजरने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर सापाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसेल. एक मुलगा जमिनीवर बसलेला असतो. त्यावेळी एक किंग कोब्रा साप मुलाच्या खूप जवळ येतो. तो साप अगदी जवळ आल्यावर लहान मुलाने सापाची मान धरल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांना बसला धक्का
किंग कोब्रा सापासोबत खेळतानाचा लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या थरारक व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख २७ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला असून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान मुलाने सापाजवळ जाणं जीवाचा खेळ करण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया काही युजर्सने दिली आहे. तर लहान मुलगा बहादूर असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.