छोटा पडदा अर्थाच टीव्ही हे माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम मानलं जातं. या माध्यमाचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. बऱ्य़ाचदा मालिका रंजक करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट्स आणले जातात.
यामागं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणं, मालिका अधिकाधिक मनोरंजक बनवणं हा हेतू असला तरी ही रंजक वळणं मालिकांना रटाळ बनवतात, अशी प्रेक्षकांमध्ये तक्रार असते. तसंच मालिकांमध्ये सध्या अशा अनेक गोष्टी दाखवल्या जात त्यामुळं नेटकऱ्यांना ट्रोल करण्यासाठी आयती संधीच मिळते.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका या ना त्या कारणामुळं चर्चेत असते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतही अनेकदा संवेदनशील विषय मांडण्यात आले आहे. मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमही केलं, परंतु आता मालिका भरकटतेय, असा सूर प्रेक्षकांमधून उमटू लागला आहे.
मालिका बंद करण्याची मागणीही केली जाते. तसंच मालिकेचं मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.
या मालिकेत सुरुवातीपासूनच विवाहबाह्य संबंधावर भाष्य करण्यात आलं आहे. अरुंधती आणि अनिरुद्धच्या संसारात संजनाची एन्ट्री झाल्यानं दोघांचा संसार तुटला. संजना आणि अनिरुद्धचं लग्न झालं. अरुंधतीनं मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी शिक्षण, छंड आवडीनिवडी याचा त्याग केल्याचं दाखवण्यात आलं.
पण पण आता या मुलाच्या वागण्याचाही तिला धक्का बसला आहे. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, आता सून गरोदर असतानाही लेकाचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर… मालिकेत आलेलं हे वळणं प्रेक्षकाना आवडलं नाही. मालिकेवर प्रचंड टीका करण्यात येतेय.