संजय दत्तला ७२ कोटींची संपत्ती दान, पण निशा पाटलांची शेवटची इच्छा अधुरीच राहिली

Uncategorized

चित्रपट कलाकारांचे जबरा फॅन आपल्या आवडत्या हिरो-हिरोईनचा चेहरा किंवा नाव स्वतःच्या शरीरावर टॅटू करुन घेत असल्याच्या बातम्या नवीन नाहीत. आपल्या लाडक्या सुपरस्टारला भेटण्यासाठी चाहत्यांनी शेकडो मैलांचा प्रवास केल्याच्या घटनाही अनेकदा ऐकायला मिळतात. पण एखाद्या चाहत्याने आपल्या आवडत्या स्टारच्या नावे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हस्तांतरित केल्याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?

   

हा भाग्यवान अभिनेता म्हणजे संजय दत्त. ही घटना २०१८ मधील आहे. “मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणाऱ्या निशा पाटील यांनी आपला संपूर्ण बँक बॅलन्स तुमच्या नावे केला आहे” असा फोन संजय दत्तला पोलिसांनी केला होता. निशा पाटील संजय दत्तसाठी पूर्णपणे अनोळखी होती. त्यामुळे संजयही चक्रावून गेला. आपल्या फॅनचं प्रेम पाहून तो भारावून गेला.

हे वाचा:   अंजली अरोराने बाथरूममध्ये कपडे काढून केला डान्स , पाहा नवीन व्हिडिओ व्हायरल

संजय दत्तने इंडस्ट्रीत जवळपास चार दशकं पूर्ण केली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहे. सुनील दत्त आणि नर्गिस यांचा वारसा पुढे नेत असतानाच त्याने स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

९० च्या दशकात संजय दत्तच्या लांब केसांमुळे त्याला स्टाईल आयकॉन मानले जात होते. संजय दत्तला त्याच्या आयुष्यात असंख्य चाहते मिळाले असतील, पण निशा पाटील यांच्यासारख्या फॅनला तो कदाचित कधीही विसरणार नाही.

संजय दत्तची जबरदस्त चाहती असलेल्या असलेल्या निशा पाटील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांसह एकूण ७२ कोटी रुपये संजयच्या नावे केले होते. १५ जानेवारी २०१८ रोजी दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.

निशा पाटील गृहिणी होत्या. त्या आपली भावंडं आणि ८० वर्षांच्या आईसोबत राहत होत्या. त्यांच्या अंत्यविधींनंतर कुटुंबासमोर मृत्यूपत्राचे वाचन करण्यात आले. निशा यांच्या इच्छेबद्दल पाटील कुटुंबीयांना आधी माहिती नव्हती. निशा यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन आठवड्यांनी त्यांच्या दानाविषयी संजयला माहिती झालं.

हे वाचा:   करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो व्हायरल

संजय दत्तला मात्र या चाहतीच्या इच्छेचं ओझं झालं. त्याने तातडीने बँक ऑफ बडोदाच्या वाळकेश्वर शाखेशी ईमेलने संपर्क साधला. निशा पाटील यांनी आपल्या नावे केलेली सर्व मालमत्ता संजय दत्तने त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांकडे तातडीने हस्तांतरित होईल, याची काळजी बाळगली. त्यामुळे आपली संपत्ती लाडक्या सुपरस्टारला मिळावी, ही निशा यांची इच्छा एकप्रकारे अपूर्णच राहिली.

Leave a Reply