लाखात एक बुध्दीमान माणूस फोटोमध्ये लपलेले 3 पक्षी शोधून दाखवू शकतो; फोटो ZOOM करा उत्तर द्या

Uncategorized

एखादं फोटो किंवा चित्र पाहून प्रत्येक व्यक्तीच्या मनात येणारे विचार वेगवेगळे असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा दृष्टिकोन तो फोटो किंवा चित्रावरून समजतो. म्हणूनच ऑप्टिकल इल्युजन किंवा दृष्टिभ्रमाच्या कोड्यांमध्ये फोटो किंवा चित्रांचा वापर केलेला असतो. अशी कोडी सोडवणं मनोरंजकदेखील असतं.

   

सोशल मीडियावर अशी कोडी खूप लोकप्रिय होण्याचं हे एक कारण असतं. असंच एक कोडं सध्या व्हायरल होतंय. यात वाचकांना चित्रात लपलेले 3 पक्षी शोधायचे आहेत. 15 सेकंदात हे आव्हान पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची बुद्धिमत्ता अफाट असेल, यात वाद नाही.

ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात वडील आपल्या दोन मुलांसोबत काही काम करताना दिसत आहेत. तिथे लाकडाची एक फळी दिसते आहे. तसंच त्यांच्या मागे एका झाडाचं खोडही दिसत आहे. लाकडी फळ्या, करवत व इतर काही साहित्यही तिथे दिसत आहे. त्यांच्यासोबत एक कुत्र्याचं पिल्लूही तिथे आहे. वाचकांना या चित्रात लपलेले 3 पक्षी आणि आणखी काही वस्तूही शोधायच्या आहेत. ते 15 सेकंदांमध्ये शोधणं हे मोठं आव्हान वाचकांसमोर आहे.

हे वाचा:   मुलापेक्षा कमी वयाच्या मुलीबरोबर ज्येष्ठ अभिनेत्यानं केलं लग्न; किंसिंग सीन होतोय व्हायरल | #southindianactor #bablooprithiveeraj #loveaffair

चित्रात लपलेले पक्षी शोधणं अवघड वाटत असेल, तर पुन्हा एकदा चित्र काळजीपूर्वक पाहा. त्यात इतरत्र पडलेल्या वस्तूंमध्ये काही आकार दिसतायत का याचा शोध घ्या. या चित्रातून तुम्हाला काय शोधायचं आहे हे सांगितलं तर तुम्हाला उत्तर शोधणं सोपं होईल.

या चित्रात लपलेलं बदक, फुलपाखरू आणि वटवाघूळ शोधायचं आहे. तसंच गाजर आणि फुगाही शोधायचा आहे. चित्रातल्या वस्तूंमध्येच कुठे तरी हे सगळे पक्षी व वस्तू सापडतील. आतापर्यंत 99 टक्के जणांना हे कोडं सोडवणं जमलेलं नाही. तुम्हालाही जमत नसेल, तर सोबत दिलेल्या चित्रात ते 3 पक्षी आणि वस्तू दाखवलेल्या आहेत.

दृष्टिभ्रमाची कोडी मानसिक बुद्धिमत्तेचा कस पाहणारी आणि आकलनविषयक बुद्धी तपासणारी असतात. मेंदू आणि डोळ्यांचा तार्किकदृष्ट्या वापर करून ही कोडी सोडवायची असतात. अनेकदा ही चित्रं डोळ्यांना फसवणारी असतात. त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा पाहावी लागतात. दृष्टिभ्रमाच्या चित्रांमुळे बुद्धिमत्ता जशी तपासली जाते, तसंच त्यामुळे मनोरंजनही खूप होतं.

हे वाचा:   लघुशंकेच्या ब्रेकसाठी कारमधून उतरला आणि बायकोलाच विसरला; १५० किमी प्रवास केल्यानंतर कळलं अन्…

त्यातल्या अवघड कोड्यांमुळे अनेकांना ती सोडवायला आवडतं. एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करण्याची क्षमता आपल्यात किती आहे, हेही यामुळे तपासता येतं. व्यक्तिमत्त्व उलगडण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे अनेक मानसोपचारतज्ज्ञांकडून याचा वापर केला जातो.

Leave a Reply