Urfi Javed Education: चर्चा तर होणारच! फॅशनमुळे ट्रोल होणारी उर्फी जावेदचे शिक्षण ऐकून तुम्ही पण हैरान व्हाल

Uncategorized

फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेत असते. तिचा पेहराव अनेकजणारंना विचित्र वाटतो पण तिचा आत्मविश्वास प्रत्येक लूकमध्ये पाहण्यासारखा आहे. दरम्यान उर्फीने मनोरंजन क्षेत्रात स्थान मिळवण्यापूर्वी फॅशन डिझायनरच्या स्टुडिओमध्ये इंटर्नशिप केली होती. तिच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

   

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी लखनौ येथे झाला. माझ्या घरातील वातावरण खूप परंपरावादी होते. ज्यामुळे मी आणि माझी बहिण घरातून पळून गेल्याचे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले. उर्फीच्या आईचे नाव झाकिया सुलताना आहे. उर्फीला ३ बहिणी (उरुसा जावेद, असफी जावेद आणि डॉली जावेद) आणि एक लहान भाऊ (सलीम जावेद) आहे.

उर्फी जावेदने लखनौच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. बारावीनंतर तिने लखनौ येथील एमिटी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशन विषयात ग्रॅज्युएशन केले. उर्फीचे वडील तिचा आणि तिच्या बहिणींचा शारीरिक आणि भावनिक छळ करत असत. त्यामुळे उर्फी आपल्या बहिणींसह दिल्लीला पळून गेली. उर्फीने काही महिने दिल्लीतील फॅशन डिझायनर स्टुडिओमध्ये इंटर्नशिप केली.

हे वाचा:   कपिल शर्माने कियाराला विचारला `हा` प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे ट्रोल होते. अनेकजण तिच्यावर टिका करतात. पण अनेकजण तिच्या आत्मविश्वासाची प्रशंसा करतात. निगेटिव्ह कमेंट्सचा ती जास्त विचार करत नाही. परिधान केलेले जवळजवळ सर्व पोशाख तिने स्वतः डिझाइन केलेले असतात. उर्फीने काही काळापूर्वी तिच्या नावाचे स्पेलिंग बदलून Uorfi असे केले आहे.

उर्फी जावेदने २०१५ मध्ये ‘तेढी मेढी फॅमिली’ या टीव्ही शोद्वारे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. ‘चंद्रनंदिनी’, ‘बेपनाह’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही ती दिसली आहे. तिला २०२१ मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ मधून सर्वाधिक स्क्रीन प्रेझेन्स आणि प्रसिद्धी मिळाली. पण यातही ती बिग बॉसच्या घरात फक्त १ आठवडा राहू शकली.

Leave a Reply