‘मुख्य भूमिकेसाठी त्याने माझ्याकडून…’, नयरतारा हिच्याकडून कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा

Uncategorized

झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. सेलिब्रिटींची लाईफ स्टाईल, त्यांच्या चाहत्यांची संख्या इत्यादी गोष्टींमुळे इंडस्ट्री बाहेरुन प्रचंड ग्लॅमरस वाटते. पण इंडस्ट्रीतील अशा अनेक गोष्टी ज्या चाहत्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामधील एक म्हणजे कास्टिंग काउच. इंडस्ट्रीचं काळं सत्य म्हणजे कास्टिंग काउच… आतापर्यंत अनेक कलाकारांना कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे. पूर्वी कलाकार कास्टिंग काउचबद्दल उघडपणे बोलत नव्हते. आता मात्र अनेक सेलिब्रिटींनी करियरच्या सुरुवातीला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल स्पष्ट सांगतात. अभिनेत्री नयनतारा हिने देखील तिला आलेल्या अनुभवाबद्दल स्पष्ट सांगितलं आहे. अभिनेत्रीने केलेला खुलासा प्रचंड धक्कादायक आहे.

   

नयनतारा हिने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत अभिनेत्रीने कास्टिंग काउचबद्दल स्वतःला आलेला अनुभव शेअर केला आहे. कास्टिंग काउचबद्दल नयनतारा म्हणाली, ‘सिनेमात मुख्य भूमिका देण्याऐवजी निर्मात्याने माझ्याकडून काही ‘मागण्या’ केल्या होत्या.’ पण अभिनेत्रीने निर्मात्याने केलेली मागणी आणि ऑफर दोन्ही फेटाळल्या.

हे वाचा:   “दादा गुटखा खातात…” कथित बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केल्याने सई ताम्हणकर ट्रोल

महत्त्वाचं म्हणजे कास्टिंग काउचबद्दल स्वतःला आलेला अनुभव सांगताना अभिनेत्रीने निर्मात्याचं नाव सांगितलेलं नाही. नयनतारा आज दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

महत्त्वाचं म्हणजे, नयनतारा हिने कास्टिंग काउचबद्दल खुलासा करण्यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे. अभिनेता रणवीर सिंग ते अभिनेत्री कंगना रनौत हिच्यापर्यंत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी करियरच्या सुरुवातीला कास्टिंग काउचसारख्या वाईट अनुभवांचा सामना करावा लागला आहे. कास्टिंग काउचमुळे अनेक कलाकारांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचं देखील अनेकदा समोर आलं.

फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी करियरच्या सुरुवातीला कास्टिंग काउचसारख्या वाईट अनुभवांचा सामना केला आहे. अभिनेत्री राधिका आपटे पासून नयनतारा हिच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी इंडस्ट्रीमधील काळं सत्य जगासमोर आणलं आहे.

हे वाचा:   लग्नानंतर काय बदललं? राणादा म्हणतो, “मी विसरून जातो, घरी बायको…”

अभिनेत्री नयनतारा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनताराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील नयनताराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अभिनेत्री सध्या तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन (Nayantara And Vighnesh Shivan) नुकतेच सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. नयनतारा आणि विघ्नेश यांचा विवाह यावर्षी 9 जून 2022 रोजी झाला होता.

Leave a Reply