बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची नेहमीच चर्चा झाली आहे. दोघांची दोन्ही मुलं आता इंडस्ट्रीत स्थिरावत आहे. मात्र या दोघांची लव्ह स्टोरीदेखील खूपच वेगळी आहे. ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी ‘चमेली’ अर्थात अमृता सिंह आणि त्यावेळी स्ट्रगलर असणारी सैफ अली खान यांनी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले आणि सर्वांनाच धक्का दिला. दोघांचे धर्म वेगळे, वयामधील अंतर या सगळ्याच्या पलीकडे जात, बंधनं तोडत दोघांनी लग्न केले. पण एका कडवट वळणावर हे नाते संपले. जाणून घेऊया यांची कहाणी.
सैफ अली खान आणि अमृता सिंह पहिल्यांदा राहुल रवैलच्या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान भेटले, ज्यावेळी सैफचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार होते. त्यावेळी अमृता सिंहबरोबर सैफचे फोटोशूट करण्यात आले होते. यावेळी सैफच्या चार्म आणि वागण्याने अमृताने प्रचंड प्रभावित झाली होती. तर सैफने शूटदरम्यान जेव्हा अमृताच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तिने पहिल्यांदा त्याला जवळून पाहिले होते.
स्ट्रगलर असतानाही हिमतीमुळे झाली होती अमृता प्रभावित
दोघांचेही पहिल्या भेटीतील प्रेम नक्कीच नव्हते. पण मग असं नक्की काय घडलं की दोघं एकमेकांना आवडू लागले. कारण अमृता त्यावेळी टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. तर सैफची नुकतीच सुरूवात होती. पण शूटिंगच्या वेळी कुठेही न अवघडता अमृताच्या खांद्यावर बिनधास्त सैफने हात ठेवणे तिला फारच साहसी आणि हिंमतीचे वाटले होते.
अमृताच्या भेटीनंतर सैफ झाला होता बेभान
फोटोशूट संपल्यानंतर सैफ अली हा खान हा अमृता सिंहच्या वागण्याबोलण्याने फारच प्रभावित झाला होता. अमृता सिंहला भेटण्यासाठी अत्यंत आतुर होता आणि त्याला एकदा तरी अमृताला पुन्हा भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे सैफने हिंमत करून अमृताला कॉल केले आणि डिनर डेटसाठी विचारले. ‘तुम्हाला माझ्याबरोबर डिनरसाठी बाहेर यायला आवडेल का?’ असा प्रश्न सैफने अमृताला विचारला होता.
अशी झाली पहिली डिनर डेट
अचानक आलेल्या या फोनमुळे अमृताला काहीच कळलं नाही. मात्र तिने सैफला सांगितले की, ‘मी रात्री जेवण्यासाठी बाहेर जात नाही. पण तुम्हाला हवं असेल तर रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही माझ्या घरी येऊ शकता’. अमृताने आमंत्रण दिल्यानंतर त्याच रात्री सैफ न राहवून घरी पोहचला होता आणि मग त्यांची पहिली डिनर डेट झाली होती.