नमस्कार मित्रांनो, जर आपल्या घरामध्ये सतत काहीना कुरबुरी चालत असतील सतत भांडणे होत असतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट या सगळ्यामुळे जर आपल्या घरातमध्ये माता लक्ष्मी टिकत नसेल पैसा जर टिकत नसेल तर आपण ही घरातील पिडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपे असा उपाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे.
दही आणि जर दही तुम्ही घरी बनवू शकाल तर अतिशय उत्तम आणि तांदूळ घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृश्य आणि अदृश्य अश्या शक्ती वावरत असतात या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर कळत न कळत होत असतो.
या शक्तींच्या प्रभावामुळे आपल्या घरावर काही संकटे येतात बऱ्याच वेळेस अस होत की काहींना हातामध्ये आलेला पैसा सुद्धा निघून जातो किंवा ज्याला आपण म्हणतो की तोंडातून घास हिरावून घेणे अश्या प्रकारच्या गोष्टी घडतात. तर या सगळ्यासाठी दृश्य व अदृश्य शक्तींचा मोठा हात त्या मागे असतो तर या शक्तींना प्रसन्न कराव लागत.
त्या शक्तींना खुश ठेवाव लागत आणि त्यासाठी वास्तू शास्त्र जोतिष शास्त्र तसेच समुद्र शास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत त्यापैकी एक अतिशय सोपा मार्ग ते म्हणजे दही आणि भाताचा उपाय आहे. ज्या प्रकारे या दृश्य व अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहचवतात तसेच या शक्ती तुम्हाला खूश सुद्धा ठेऊ शकतात.
हा उपाय करण्यासाठी आपण ताज दही घ्यायच आहे आणि तांदळाचा भात आपल्याला याठिकाणी घ्यायच आहे मऊ भात तयार करून घ्या आणि नंतर दही व भात एकत्र मिसळून घ्या आणि हा जो दही भाताचा मिश्रण आहे हा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचे आहे. यासाठी तुम्ही दिवसातील कोणतीही वेळ निवडू शकता त्या वेळी आपण हा दही भात आपल्या घराबाहेर ठेवणार आहोत.
व ज्या ठिकाणी आपण दही भात ठेवणार आहे त्या ठिकाणी कुत्रा, मांजर किंवा कोणतेही प्राणी, पक्षी असेल त्यांना हा दही भात सहज खाता येईल अश्या ठिकाणी हा दही भात आपल्याला आपल्या घराबाहेर ठेवायचं आहे. हे ठेवल्यानंतर आपण काही वेळाने निरीक्षण करा अगदी 3 ते 4 तास जाऊद्या प्राण्यांना किंवा पक्षांना खाऊ द्या.
आणि जर प्राणी किंवा पक्षी हे दही भात खाऊन संपवला तर लक्षात घ्या आपल्या घरामध्ये पिडा आहे. जर हे दही भात त्यांनी खाऊन संपवला नाही तर आपल्या घरात पिढा नाही या दृश्य व अदृश्य शक्तीमुळे आपल्या घरात कोणतेही नुकसान होत नाही असे समजावे. या पाठीमागच शास्त्र अस आहे की हे जे दही आहे ते शक्य तो गाईच्या दुधा पासून बनलेलं असाव गाईपासून बनलेलं जर दही असेल तर त्याचे परिणाम अतिशय जलद आपल्याला मिळतात.
याच कारण अस आहे की गाईच्या दुधामध्ये तिच्या रक्तपेशी सुद्धा आलेल्या असतात आणि अस हे गाईच्या रक्तपेशी पासून तयार झालेल दही ज्या वेळी आपण या पशूंना प्राण्यांना खाण्यासाठी घराबाहेर ठेवतो त्यावेळी या दह्याचा स्पर्श हा आपल्या घरातील दृश्य व अदृश्य शक्तींना अपोआप होत असतो.
आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्यांचा ब ळी न घेता या शक्ती आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्या प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घरातील पिडा कमी होते. तर हा उपाय आपण दररोज करा व एक विशिष्ट वेळ ठरवा त्यावेळेच हा दही भात आपण बाहेर नेऊन ठेवा. तसेच सर्व करताना आपण आपल्या घरात मांसाहार करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची ह त्या म्हणजेच एखाद्या देवाला ब ळी देणे किंवा कोंबडा का-पणे अश्या प्रकारच्या प्राणी ह त्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
जर आपण अस केलं तर तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल की तुमच्या घरातील पिडा कमी झालेली आहे घरात सुख शांती राहील पैश्याचे काही समस्या असतील तर समस्या सुद्धा हळूहळू कमी होईल नौकरी लागतील. मात्र हा उपाय जोपर्यंत आपल्या पिडा संपणार नाहीत तोपर्यंत नित्य नेमाने हा उपाय करत चला तुम्हाला याचे शुभ परिणाम नक्कीच मिळतील.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.