दक्षिण भारतीय अभिनेत्री राय लक्ष्मी नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री दररोज तिच्या सोशल अकाऊंटवर तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करताना दिसते. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते असले तरी एकेकाळी महेंद्रसिंग धोनीसाठी तिचे हृदय धडधडलं होतं.
हे प्रकरण जरी वेगळं असलं तरी, माहीने कधीही अभिनेत्रीला त्याची गर्लफ्रेंड म्हणून जाहीरपणे स्वीकारलं नाही, परंतु राय लक्ष्मीने अनेकवेळा मुलाखतींमध्ये ही गोष्ट सांगितली आहे.
लग्नापूर्वी धोनीचं नाव जुली फेम अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. 2008-2009 च्या सुमारास माही आणि राय लक्ष्मी यांच्या डेटिंगच्या बातम्या खूप व्हायरल झाल्या होत्या आणि दोघंही अनेकदा एकत्रही दिसले होते.
2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राय लक्ष्मीने धोनीसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं की, ‘मला आता या गोष्टीवर विश्वास वाटू लागला आहे की, माझं धोनीसोबतचं नातं एका काळ्या डागसारखं आहे जे जास्त काळानंतरही जात नाही.
‘या अभिनेत्रीने असंही सांगितलं आहे की, ती धोनीशिवाय इतर कोणासाठीही इतकी रोमँटिक भावना आणू शकली नाही. माजी क्रिकेटपटू श्रीशांतसोबतही तिचं नाव जोडलं गेल्याची माहिती आहे.
श्रीसंतने लिंक-अप नाकारलं असलं तरी, त्याने लक्ष्मी रायला त्याच्या चित्रपटांच्या सेटवर भेटल्याचं कबूल केलं होतं.राय पुढे म्हणाली की, ब्रेकअप सौहार्दपूर्ण होतं आणि त्यांना अजूनही एकमेकांबद्दल आदर आहे. अभिनेत्री स्वतःला खूप आनंदी व्यक्ती मानते आणि तिच्या कामाला प्राधान्य देते.