अभिनेत्री सारा अली खान लोकप्रिय आहे. तिचे फन्सही खूप आहेत. तिचे फोटो, व्हिडिओज चाहत्यांना आवडतात. सारा नेहमीच आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असते. थोड्या वेळात ते व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ समोर आलाय. पण या व्हिडिओमुळं साराला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
साराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते आणि नेटकऱ्यांनी सारावर निशाणा साधलाय. तिला ट्रोल करण्यात येतंय.
काय आहे नेमका हा व्हिडिओ ?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत सारा तिच्या काही मैत्रिणींसोबत दिसतेय. ती तिच्या मैत्रिणीचा हात धरून मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसतेय.
रेस्टॉरंटच्या आज जात असताना गेटजवळ एक सुरक्षारक्षक उभा असल्याचं पाहायला मिळतंय. सारा रेस्टॉरंटच्या आत जात असताना तिनं त्या सुरक्षारक्षक चुकीचा स्पर्श केल्याचं नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून म्हटलं आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत होती, त्यामुळं तिला कसलंही भान राहिलं नाही, असं नेटकरी म्हणत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओसंदर्भात सारानं अद्यापही काही स्पष्टीकरण दिलं नाही.