अंबानी कुटुंबाचा रॉयल थाट, दिवाळीआधी खरेदी केल्या दोन Rolls Royce, पाहा कशा आहेत लग्झरी कार्स

Uncategorized

Amabni Family New Rolls Royce : देशातले दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाकडे अनेक लग्झरी कार्स आहेत. यामध्ये आता दोन नवीन आलिशान कार्सची भर पडली आहे. दिवाळी येताच अंबानी कुटुंबियांनी आपल्या कार कलेक्शनमध्ये दोन नवीन रोल्स रॉयस कार्स वाढवल्या आहेत. यापैकी एक कार अहमदाबाद येथे तर दुसरी कार मुंबईत ठेवली आहे. हे रोल्स रॉयसचे फँटम मॉडेल्स आहेत.

   

एका पेजद्वारे याबाबतची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्या नवीन रोल्स रॉयस कारचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ही कार डुअल टोन कलरमध्ये येते. ज्यामध्ये ज्युबली सिल्व्हर आणि बोहेमियन रेडचा देखील समावेश आहे. दुसरी फँटम कार मुंबईत ठेवली आहे. ही कार मूनस्टोन पर्ल रंगाची आहे.

अंबानी कुटुंबियांकडे आधीपासूनच मुंबईत रोल्स रॉयस फँटम ईडब्ल्यूबी कार उपलब्ध आहे. या कारची किंमत १३.५ कोटी रपये इतकी आहे. परंतु ही किंमत कस्टमायजेशनच्या आधीची आहे. कस्टमायजेशननंतर ही किंमत याहून जास्त असेल.

हे वाचा:   दोन बायका फजिती ऐका! प्रसिद्ध यूट्यूबरच्या दोन्ही पत्नी सोबतच प्रेग्रेंट; फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ

न्यू जनरेशन रोल्स रॉयस फँटम कार अॅल्युमिनियम स्पेकफ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कार जुन्या मॉडेलच्या तुलनेत ३० टक्के हलकी आहे. तसेच जुन्या मॉडेलच्या तुलनेत ७७ मिमी लहान, ८ मिमी लांब आणि २९ मिमी रुंद आहे. यामध्ये २४ स्लॅटवालं ग्रिल, एलईडी डीआरएलसह नवीन एलईडी प्रोजेक्ट हेडलाईट देण्यात आली आहे.

या कारमध्ये ६.७५ लीटर ट्विन टर्बोचार्ज्ड व्ही १२ इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन १७०० आरपीएमवर ५६३ बीएचपी पॉवर आणि ९०० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. कंपनीने फँटम ८ च्या इंजिनला ८ स्पीड सॅटेलाइट-अॅडेड ट्रान्समिशनसह सुसज्ज बनवल आहे. ही लग्झरी कार ५.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास इतका वेग धारण करू शकते. या कारचा टॉप स्पीड २५० किमी प्रति तास इतका आहे.

हे वाचा:   कोमट पाणी कोणी प्यावं, कोणी पिवू नये? डॉक्टर देतात मोलाचा सल्ला...

रोल्स रॉयस फँटम स्टँडर्ड मॉडेल ८ ही कार ५,७६२ मिमी लांब, २,०१८ मिमी रुंद, १,६४६ मिमी उंच कार आहे. या कारचा व्हीलबेस ३,५५२ मिमी लांब आहे. या कारचा व्हीलबेस २२० मिमी लांब आणि ११ मिमी उंच आहे. ही जगातली सर्वात कमी आवाज करणारी लग्झरी कार आहे.

जुलै महिन्यात अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये बेन्टले बेन्टायगा कार जोडली होती. हे २०२१ चं मॉडेल आहे. हे मॉडेल ब्रिटीश कार निर्मात्या कंपनीने २०२० मध्ये सादर केलं होतं. अंबानी कुटुंबियांकडे आधीपासूनच एक रेसिंग ग्रीन आणि ब्राऊन कलर बेन्टायगा कार आहे. नवीन मॉडेलचा रंग पांढरा आहे.

Leave a Reply