बॉलीवूडमध्ये काही कपल नेहमीच इतरांना कपल गोल्स देतात. त्यात काही खास अशा कपल्सच्या यादीत, किरण राव आणि आमिर खानचं देखील नाव होतं. बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून आमिरला ओळखलं जात.
मात्र हाच आमिर खान आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठी, कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बघायला मिळतो. आता सोशल मीडियावर चर्चा आहे ती आमिर खानच्या लग्नाची.अमिरने कियाराशी लग्नगाठ बांधली असल्याचं म्हटलं जात आहे.
खरंतर असा एक फोटोही व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये कियारा अडवाणी आणि आमिर खान लग्नाच्या जोड्यात दिसत आहेत. पण आता आम्ही तुम्हाला या व्हायरल फोटो मागचं सत्य सांगणार आहोत.काही काळापूर्वी बॉलीवूड कलाकार कियारा अडवाणी आणि आमिर खान मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाले होते.
यावेळी दोघंही वर वधूच्या गेटअपमध्ये दिसले. कियार अडवाणी वधूच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे आमिर खानही पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत होता. समोर आलेल्या फोटोनंतर त्यानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
आमिर खान आणि कियारा अडवाणी एकमेकांशी लग्न करणार आहेत की काय, अशीही अनेकांनी चर्चा केली. असा अंदाज अनेकांनी सोशल मीडियावर लावला. मात्र ही एक अफवा आहे. या दोघांचा व्हायरल होणारा हा फोटो एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यानचा आहे.
आमिर खान आणि कियारा अडवाणी अलीकडेच एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मुंबईतील सेटवर गेले होते. जिथे मीडियाने त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कियारा अडवाणी हेवी पिंक कलरच्या लेहेंग्यात सुंदर दिसत आहे.
अभिनेता आमिर खानही वराच्या लूकमध्ये दिसत आहे. कियारा आणि आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कियारा शेरशाह या चित्रपटामुळे चर्चेत राहिली आहे. त्याचवेळी आमिर खानने त्याच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.