‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीला ‘या’ देशात डान्स करण्यास मनाई; कारण ऐकून थक्क व्हाल

Uncategorized

मुंबई: ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही (Nora Fatehi) बॉलिवूडमध्ये (Bollywood) परफेक्ट फिगर आणि डान्स स्टेप्ससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या डान्सवर केवळ चाहतेच नाही तर अनेक अभिनेत्रीही फिदा आहेत. मात्र, तिचा हा डान्सच आता तिची डोकेदुखी ठरू लागली आहे. सध्या ती कलर्स टीव्हीवर ‘झलक दिखला जा’ (jhalak dikhhla jaa) या शोची जज म्हणून काम करत आहे. हे सर्व सुरू असताना नोरा बाबत एक महत्त्वाची बातमी आली आहे. नोराला बांगलादेशच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळालेली नाही. आता या मागचं कारण काय आहे हे जाणून घ्याच.

नोरा फतेही बांगलादेशातील ढाका येथील एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करणार होती. मात्र, बांगलादेश सरकारने तिला या डान्स शोमध्ये भाग घेण्यास मनाई केली आहे. सरकारने डॉलर वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत सोमवारी बांगलादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने एक नोटीस जारी केलं आहे.

हे वाचा:   लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा एकदा गरोदर?

वैश्विक परिस्थिती लक्षात घेता विदेशी मुद्रा भंडारवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून नोराला या इव्हेंटमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. येथील वुमेन लीडरशीप कार्पोरेशनने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात नोराला डान्स करण्यासाठी बोलावलं होतं. तिला अॅवार्ड देण्यासाठीही बोलावण्यात आलं होतं. मात्र, विदेशी मुद्रा भंडारावर परिणाम होऊ नये म्हणून डॉलरमध्ये भरपाई करण्यास बँकांनी प्रतिबंध घातल्याचं सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटलं आहे.

बांगलादेशातील विदेशी मुद्रा भंडार 12 ऑक्टोबर रोजी कमी होऊन 36.33 बिलियन डॉलर झाला आहे. एक वर्षापूर्वी तो 46.13 बिलियन डॉलर एवढा होता. चार महिन्याच्या आयातील कव्हर करण्यासाठी तो पुरेसा होता.

नोरा फतेही ही मॉरोकन-कॅनेडियन कुटुंबाशी संबंधित आहे. आपलं करियर घडवण्यासाठी तिने भारतात पाऊल ठेवलं. तिच्या डान्समुळे ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. गेल्या महिन्यात तिचं नाव 200 कोटींची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आलं होतं.

हे वाचा:   48 व्या वयात रवीना ने ओलांडल्या सर्व सीमा, वर पासून खालपर्यंत बॉडी बघून पागल झाले लोक

त्यावेळी ईडी आणि दिल्ली पोलिसांनी तिला बोलावून प्रत्येक अँगलने तिची चौकशी केली होती. सध्या ती लोकप्रिय शो झलक दिखला जामध्ये जज म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply