पंतच्या मागे-मागे ‘उर्वशी’ पोहोचली ‘या’ शहरात, अखेरच्या क्षणी ऋषभकडून चकवा!

Uncategorized

पंतच्या मागे-मागे ‘उर्वशी’ पोहोचली ‘या’ शहरात, अखेरच्या क्षणी ऋषभकडून चकवा!

   

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात पुन्हा एकदा पकडा-पकडीचा खेळ सुरू झाल्याचे दिसत आहे. या दोघांमधली केमिस्ट्री कोणापासून लपून राहिलेली नाही पण ती कधीच उघडपणे समोर येत नाही. या एपिसोडमध्ये उर्वशी रौतेला शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात पोहोचली, पण योगायोग पहा, त्याच दिवशी भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने पर्थला बाय-बाय म्हटले. शनिवारी पंतने उर्वशीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या दुसऱ्या शहरासाठी विमान पकडले.

पर्थला पोहोचताच उर्वशीपासून पंत गेला दूर…

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या पर्थमधील आगमनाची माहिती इंस्टाग्रामवर एका फोटोसह शेअर केली आहे. उर्वशीने पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘व्हॉट अ पर्थ-परफेक्ट डे.. पण हा दिवस किती परिपूर्ण आहे, हे येत्या काही तासांतच कळेल.’ पण उर्वशीसाठी हा दिवस काही खास गेला नाही. कारण दुसरीकडे ऋषभ पंत ब्रिस्बेनला निघून गेला. मात्र, उर्वशीच्या मागील प्रवासाची योजना पाहता ती ब्रिस्बेनलाही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Urvashi Rautela-Rishabh Pant)उर्वशीचे खराब टायमिंग म्हणा किंवा योगायोग म्हणा ती कुठे पोहोचते तेव्हा ऋषभ पंत ॲक़्शनमध्ये दिसत नाही. यापूर्वी, आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाच्या सामन्यादरम्यान अभिनेत्री उर्वशी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पोहोचली होती. योगायोगाने, ती पाहण्यासाठी पोहोचलेल्या सामन्यात पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्यामुळे उर्वशी खूप ट्रोल झाली होती.

रौतेलाने पंतबद्दल भाष्य करून खळबळ उडवून दिली..

हे वाचा:   हनिमूनची विचित्र परंपरा; नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई! कारण...

काही महिन्यांपूर्वी उर्वशीने सांगितले होते की, ऋषभ पंत दिल्लीत तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या हॉटेलमध्ये पोहोचला होता. पंतने तेथे उर्वशीला अनेक फोन केले पण व्यस्त आणि थकल्यामुळे ती बोलू शकली नाही.

उर्वशीने सांगितले की ती पंतला नंतर मुंबईत भेटली. (Urvashi Rautela-Rishabh Pant)मात्र, उर्वशीने पंतने जे सांगितले आहे ते खोटे असल्याचे पंतने जाहीर केले होते.

तेव्हापासून सोशल मीडियावर या दोघांमध्ये अप्रत्यक्षरित्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काही दिवसांपूर्वीच उर्वशीने एक फ्लाइंग किस देत असल्याचा व्हिडिओ शेअर केल होता. त्याच दिवशी ऋषभ पंतचा वाढदिवस होता. त्यामुळे उर्वशीने पंतलाच शुभेच्छा दिल्याचे नेटक-यांनी म्हटले आणि ट्रोल केले.

Leave a Reply